प्रशांत दामलेंनी जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांना नाटक पाहता यावं, म्हणून घेतला हा निर्णय
अभिनेते प्रशांत दामले म्हणजे मराठी रंगभूमीवर निस्सीम प्रेम करणारे सच्चे कलाकार. लिम्का बुक आँफ रेकॉर्ड करणारे,एका दिवसात ३ वेगळ्या नाटकांचे ५ प्रयोग सादर करणारे विश्वविक्रमवीर कलाकार प्रशांत दामले आपल्या लाडक्या मराठी नाट्यरसिकांसाठी सतत काही ना काही आयडियाची कल्पना लढवत असतात. गेले वर्षभर कोरोनामुळे नाट्यगृहं पूर्णपणे बंद होती. लॉकडाऊन संपल्यावर आणि काही ठराविक निर्बंध घालून दिल्यानंतर […]
ADVERTISEMENT
अभिनेते प्रशांत दामले म्हणजे मराठी रंगभूमीवर निस्सीम प्रेम करणारे सच्चे कलाकार. लिम्का बुक आँफ रेकॉर्ड करणारे,एका दिवसात ३ वेगळ्या नाटकांचे ५ प्रयोग सादर करणारे विश्वविक्रमवीर कलाकार प्रशांत दामले आपल्या लाडक्या मराठी नाट्यरसिकांसाठी सतत काही ना काही आयडियाची कल्पना लढवत असतात. गेले वर्षभर कोरोनामुळे नाट्यगृहं पूर्णपणे बंद होती. लॉकडाऊन संपल्यावर आणि काही ठराविक निर्बंध घालून दिल्यानंतर नाट्यगृहं पुन्हा सुरू करण्यात आली आणि ५० टक्के प्रेक्षकांच्या परवानगीने नाटकांचे प्रयोगही नाट्यगृहात होऊ लागले. नवीन नियमांनुसार मर्यादीत संख्या आणि एकंदरितच नाटकांची तिकीटं ही महागडी असल्याने सध्या प्रेक्षकांना आपलं आवडीचं नाटक इच्छा असूनही पाहता येत नाही. यावर तोडगा काढण्यासाठी आणि रसिकांचा भ्रमनिरास होऊ नये म्हणून प्रशांत दामलेंनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी एक अभिनव उपक्रम सुरु केला आहे आणि त्यात प्रायोगिक तत्वावर आपल्या नाटकांचे तिकीट दर १०० रुपये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
ADVERTISEMENT
सोशल मिडीयावर एक पोस्ट लिहीत प्रशांत दामलेंनी आपला हा अभिनव उपक्रम रसिकांसमोर मांडला आहे. दामले आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की “अनेक नाट्यरसिकांनी मला संपर्क करून सांगितले की आम्हाला सहकुटुंब नाटक बघण्याची इच्छा आहे परंतु तिकीट दर जरा जास्त असल्यामुळे आम्ही पाहू शकत नाही. म्हणूनच मी असा निर्णय घेतला आहे की बाल्कनीचा तिकीट दर जो आधी ३०० रुपये आणि आणि २०० रुपये होता, तो आता फक्त १०० रुपये ठेवण्यात येणार आहे,” अशी घोषणा प्रशांत दामलेंनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केलीय.सध्या प्रायोगिक तत्वावर केवळ गडकरी रंगायतनमध्ये दोन प्रयोगांसाठी हे दर ठेवण्यात येणार आहेत. यापैकी पहिला प्रयोग हा ‘तु म्हणशील तसं’ नाटकाचा असून तो २६ मार्च रोजी रात्री साडेआठ वाजता आहे. या नाटकाची तिकीट विक्री सुरु झाली आहे. तर दुसरा प्रयोग ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’चा असून तो २८ मार्च रोजी सायंकाळी साडेचार वाजता आहे. या नाटकाची तिकीट विक्री आजपासून सुरु होत आहे. विशेष म्हणजे ही सवलतीच्या दरातील तिकीटं बुकमायशो या वेबसाईटवर उपलब्ध होणार नसून थेट नाटगृहामधूनच ही सवलतीच्या दरातील तिकीटं विकत घेता येणार आहेत, असंही प्रशांत दामलेंनी स्पष्ट केलं आहे.
हे वाचलं का?
प्रशांत दामलेंनी हे ही स्पष्ट केलं आहे की हा प्रयोग जर यशस्वी झाला तर हळू हळू मुंबईतील सर्व नाट्यगृहांमध्ये याच पद्धतीने प्रयोग करीन. . त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या पोस्टच्या शेवटी, ‘एकमेका सहाय्य करू अवघे उचलून धरू नाटक’ असं आवाहन नाट्यरसिकांना केलं आहे.अनेक नाट्यरसिकांनी या पोस्टवर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यावरुनच प्रशांत दामले यांनी, “मलाही हुरूप आला तुमच्या प्रतिक्रिया वाचुन,” असं कमेंट करुन म्हटलं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी, “ही पोस्ट जेवढी व्हायरल करता येईल तेवढी करावी. म्हणजे आपल्याला जास्तीस जास्त रसिकांपर्यंत वेळेत पोचता येईल,” असं आवाहनही चाहत्यांना केलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT