पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बालमित्रांना केलं महत्त्वाचं आवाहन, म्हणाले…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

देशभरात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. देशात अनेक ठिकाणी कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. वाढती रूग्णसंख्या चिंताजनक आहे शिवाय याचा ताण आरोग्य व्यवस्थेवरही पडताना दिसतोय. याच पार्श्वभूमीवर आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना संबोधित केलंय.

ADVERTISEMENT

जनतेला संबोधताना पंतप्रधान मोदींनी देशातील कोरोनाची सध्याची परिस्थिती तसंच ऑक्सिजनची कमतरता यावर भाष्य केलं. दरम्यान यावेळी पंतप्रधान मोदींनी त्याचे बालमित्र म्हणजेच देशभरातील लहान मुलांना खास आवाहन केलं आहे.

Lockdown हा शेवटचा पर्याय ठेवा, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सर्व राज्यांना कळकळीचं आवाहन

हे वाचलं का?

पंतप्रधान मोदी म्हणाले, “स्वच्छता अभियानाच्या वेळी समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी माझ्या बालमित्रांनी म्हणजेच लहान मुलांनी फार मदत केली होती. यामध्ये 5, 7, 8 ते 10 मध्ये शिकणाऱ्या मुलांचा समावेश होता. त्यावेळी या लहान मुलांनी घरातील मोठ्यांना समजावलं होतं तसंच त्यांनी मनधरणी केली होती. आज मी पुन्हा या माझ्या बालमित्रांना आवाहन करू इच्छितो. लहान मुलांनो, घरी असं वातावरण तयार करा की, विनाकाम आणि विनाकारण घरातील व्यक्ती घराबाहेर जाणार नाहीत. तुमची ही गोष्टीचा खूप मोठा चांगला परिणाम होऊ शकतो.”

PM Narendra Modi : ऑक्सिजनचा तुटवडा कुणालाही भासू नये यासाठी केंद्राचे प्रयत्न सुरू

ADVERTISEMENT

केवळ लहान मुलंच नाही तर देशातील तरूणांना देखील पंतप्रधान मोदी यांनी विशेष आवाहन केलं आहे. तरूणांना आवाहन करताना मोदी म्हणाले, “देशातील तरूणांनी आपल्या सोसायटीमध्ये तसंच अपार्टमेंटमध्ये छोटी छोटी कमिटी तयार करावी. या कमिटींच्या माध्यमातून कोरोनाच्या नियमांचं तसंच अटींचं पालन करण्यासाठी मदत करावी. जर असं झाल्यास तर सरकारला कंटेनमेंट झोन ठरवण्याची तसंच लॉकडाऊनची गरज लागणार नाही.”

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT