माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा केंद्र सरकारवर आणखी एक गंभीर आरोप
राज्याला केवळ कोरोना लसीकरणात नव्हे तर महत्त्वाची वैद्यकीय उपकरणं देण्यात देखील केंद्र सरकारने महाराष्ट्राशी दुजाभाव केला आहे, असा थेट आरोप महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असताना लसीकरणाचा तुटवडा भासत असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली होती. त्यानंतर आता पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर […]
ADVERTISEMENT
राज्याला केवळ कोरोना लसीकरणात नव्हे तर महत्त्वाची वैद्यकीय उपकरणं देण्यात देखील केंद्र सरकारने महाराष्ट्राशी दुजाभाव केला आहे, असा थेट आरोप महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असताना लसीकरणाचा तुटवडा भासत असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली होती. त्यानंतर आता पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
ADVERTISEMENT
यासंदर्भात पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट केलं आहे. चव्हाण त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, “महाराष्ट्राला फक्त लसी देण्यातच नाही तर कोरोना काळात महत्वाची वैद्यकीय उपकरणे देण्यातसुद्धा केंद्र सरकारने दुजाभाव केला आहे. लोकसभेतील आकडेवारीनुसार गुजरात आणि उत्तर प्रदेश राज्यात रुग्णसंख्येच्या व्यस्त पटीने N95 मास्क, पीपीई किट्स आणि व्हेंटीलेटर्स केंद्र सरकारने दिले आहेत.” या ट्विटसोबत त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारकडून अन्य राज्यांना आणि महाराष्ट्राला देण्यात आलेली वैद्यकीय उपकरणांची आकडेवारी असलेलं पत्र जोडलं आहे.
महाराष्ट्राला फक्त लसी देण्यातच नाही तर कोरोना काळात महत्वाची वैद्यकीय उपकरणे देण्यातसुद्धा केंद्र सरकारने दुजाभाव केला आहे. लोकसभेतील आकडेवारीनुसार गुजरात आणि उत्तर प्रदेश राज्यात रुग्णसंख्येच्या व्यस्त पटीने N95 मास्क, पीपीई किट्स आणि व्हेंटीलेटर्स केंद्र सरकारने दिले आहेत. pic.twitter.com/MdYDR4Ly3W
— Prithviraj Chavan (@prithvrj) April 10, 2021
चव्हाण यांनी दिलेल्या पत्रातील आकडेवारीनुसार, महाराष्ट्राला प्रत्येक हजार रूग्णांमागे 1560 इकते N95 मास्क 723 पीपीई किट्स तर 2 व्हेंटींलेटर्स देण्यात आले आहेत. तर दुसरीकडे गुजरातला प्रत्येक हजार कोरोना रुग्णांमागे 9632 इतके N95 मास्क 4951 पीपीई किट्स आणि 13 व्हेंटीलेटर्सची उपलब्धता करून देण्यात आली आहे.
हे वाचलं का?
लसींचं वाटप करताना केंद्राने कोणत्या निकषांचा आधार घेतला तेच कळत नाही-राजेश टोपे
दरम्यान यापूर्वी “मेहरबानी करा आणि आम्हाला गरजेइतका लसींचा साठा पुरवा अशी कळकळीची विनंती केंद्राकडे केली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. तर याच मुद्द्यावरून पृथ्वीराज चव्हाण यांनी लसीपुरतीच नाही, तर अन्य वैद्यकीय उपकरणांबाबतही महाराष्ट्रासोबत दुजाभाव करण्यात येतोय असा आरोप आता केंद्रावर केला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT