मुंबईत खासगी हॉस्पिटल सोसायट्यांमध्ये करणार लसीकरण
लसीच्या तुटवड्यामुळे गेल्या काही दिवसांत मुंबईतील लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागली होती. परंतू हा तुटवडा भरुन काढण्याचा प्रयत्न प्रशासकीय यंत्रणा करत आहेत. याचाच एक भाग म्हणून आता मुंबईत खासगी हॉस्पिटल्स हाऊसिंग सोसायट्यांमध्ये लसीकरण करणार आहेत. मुंबईतील भायखळा परिसरातील मसीना हॉस्पिटलने हा उपक्रम हाती घेतला आहे. सीरम इन्स्टिट्यूटकडून मसीना हॉस्पिटलला लसीचे ८ हजार डोस मिळाले आहेत. […]
ADVERTISEMENT
लसीच्या तुटवड्यामुळे गेल्या काही दिवसांत मुंबईतील लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागली होती. परंतू हा तुटवडा भरुन काढण्याचा प्रयत्न प्रशासकीय यंत्रणा करत आहेत. याचाच एक भाग म्हणून आता मुंबईत खासगी हॉस्पिटल्स हाऊसिंग सोसायट्यांमध्ये लसीकरण करणार आहेत. मुंबईतील भायखळा परिसरातील मसीना हॉस्पिटलने हा उपक्रम हाती घेतला आहे.
ADVERTISEMENT
सीरम इन्स्टिट्यूटकडून मसीना हॉस्पिटलला लसीचे ८ हजार डोस मिळाले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये १८-४४ वयोगटातील लोकांना लस घेण्यासाठी नाव नोंदवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. अशा लोकांसाठी हा उपक्रम फायदेशीर ठरणार आहे. मसीना हॉस्पिटलने यासाठी आपल्या भागात येणाऱ्या हाउसिंग सोसायट्यांशी टाय-अप केलं असून मंगळवारपासून लसीकरणाला सुरुवात केली जाणार आहे.
हॉस्पिटल सुरुवातीच्या टप्प्यात ३०० जणांना लस देणार असून यासाठी ८५० ते ९०० रुपयांचा दर आकारला जाणार आहे. “लसीसाठी आम्ही आमची ऑर्डर एप्रिल महिन्यात दिली होती आणि यासाठी Advance Payment ही केलं होतं. सुरुवातीच्या टप्प्यात आम्ही आमच्या भागातील ४-५ सोसायट्यांमधील लोकांना ही लस देणार आहोत.” मसीना हॉस्पिटलचे सीईओ बेहराम खोदादजी यांनी मुंबई तक शी बोलताना माहिती दिली.
हे वाचलं का?
लसींचं एकूण उत्पादन 8 कोटी, मे अखेर मिळणार फक्त 5 कोटी; नेमकं गौडबंगाल काय?
हॉस्पिटल प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ६५० रुपये दर देऊन ही लस हॉस्पिटलने खरेदी केली आहे. या लसीकरणाची नोंद व्हावी यासाठी CoWin App मध्ये आवश्यक ती सुविधा करण्यात आली आहे. सुरुवातीला मुंबईतील हॉस्पिटलमध्ये BMC लस पुरवत होती. परंतू आता हॉस्पिटल्स स्वतः लस खरेदी करुन ती लोकांना देणार आहेत. पहिल्या टप्प्यात लसीकरणाला प्रतिसाद कसा मिळतो याचा अंदाज घेऊन लसीकरणाची व्याप्ती वाढवण्याचा विचार असल्याची माहिती खोदादजी यांनी दिली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT