पुणे : अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या चिमुकलीला आईनेच संपवलं!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारी घटनांची मालिकाच सुरू असून, पुन्हा एक ह्रदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. अनैतिक संबंध लपवण्यासाठी एका महिलेनं संबंधातून जन्माला आलेल्या तीन महिन्याच्या चिमुकलीची गळा आवळून क्रूरपणे हत्या केली. या घटनेनं पुन्हा एकदा पुणे शहर हादरलं आहे.

ADVERTISEMENT

पल्लवी भोंगे असं आरोपी महिलेचं नाव असून, पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे. तसेच एका विधीसंघर्षग्रस्त मुलालाही ताब्यात घेतलं आहे.

प्रकरण नेमकं काय?

हे वाचलं का?

आरोपी महिला पल्लवी भोंगे मूळची बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी आहे. तिथे असताना पतीपासून वेगळं राहणाऱ्या या महिलेचे एका मजुरासोबत अनैतिक संबध होते. त्यातून तिला दिवस गेले. पतीपासून वेगळी राहत असल्याने या प्रकरणाची काही दिवसांनी वाच्यता होईल, या भीतीपोटी ती येरवडा येथे राहणार्‍या भावाकडे 13 वर्षाच्या मुलासह राहण्यास आली होती.

पुणे : बापच निघाला नराधम; 11 वर्षाच्या मुलीवर केला बलात्कार

ADVERTISEMENT

त्यानंतर आरोपी महिलेनं तीन महिन्यापूर्वी एका मुलीला जन्म दिला. त्यानंतर घरामध्ये सर्व सुरळीत सुरू होतं. दरम्यान, दिवाळीनंतर पुन्हा गावी जावं लागणार असल्यानं आणि गावात जन्मलेल्या मुलीबद्दल सर्वांना कळेल, तेव्हा काय करायचं हा विचार महिलेला सतावू लागला.

ADVERTISEMENT

हे सर्व टाळण्यासाठी सदरील महिलेनं शुक्रवारी तीन महिन्याच्या मुलीची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर एका पिशवीमध्ये ठेवले आणि विधीसंघर्षग्रस्त मुलाला घरापासून काही अंतरावर असलेल्या नदी पात्रात ती पिशवी टाकण्यास सांगितलं. महिलेने सांगितल्याप्रमाणे त्या मुलाने केले.

हे सर्व झाल्यानंतर काही वेळाने आरोपी महिला मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात गेली. त्यानुसार पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली. तपास सुरू केल्यानंतर पोलिसांना महिला आणि विधीसंघर्षग्रस्त मुलावर संशय आला. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर महिलेनं झालेला सर्व प्रकार सांगत गुन्ह्याची कबुली दिली.

पुणे : ‘लिव्ह इन’मध्ये असताना झाला बाप, 13 दिवसांच्या बाळाला संपवलं; अडीच वर्षांनी फुटलं बिंग

प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तिथे पिशवीच्यावर दगड होते आणि त्याखाली तीन महिन्याची मुलगी मृत अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन ससून येथे शवविच्छेदन करण्यास पाठवला. तर महिलेला अटक केली, असं येरवडा पोलीस ठाण्याचे प्रमुख रवींद्रकुमार वीरगुळे यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT