'तो' गर्लफ्रेंडसोबत दारू प्यायला..नंतर प्रायव्हेट पार्टमध्ये हात टाकून तिचा खून केला अन्..हादरंवून टाकणारी घटना!

मुंबई तक

Couple Shocking Murder Case : उत्तरप्रदेशच्या फतेहपूरपासून दिल्लीच्या निर्भया प्रकरणासारखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पण या प्रकरणात प्रियकराने त्याच्या प्रेयसीवर अत्याचार केला आहे.

ADVERTISEMENT

Couple Shocking Murder Case
Couple Shocking Murder Case
social share
google news

बातम्या हायलाइट

point

प्रेयसीसोबत दारू प्यायल्यानंतर प्रियकराने केलं मोठं कांड

point

पोलीस तपासात समोर आली धक्कादायक माहिती

point

जंगलात नेमकं काय घडलं?

Couple Shocking Murder Case : उत्तरप्रदेशच्या फतेहपूरपासून दिल्लीच्या निर्भया प्रकरणासारखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पण या प्रकरणात प्रियकराने त्याच्या प्रेयसीवर अत्याचार केला आहे. आरोपी प्रियकराने महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये हात टाकून तिची निर्घृण हत्या केली. महिलेवर बलात्कार केला नाही, असं आरोपीचं म्हणणं आहे. पण पोलिसांकडून याप्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

काय आहे संपूर्ण घटना?

उत्तरप्रदेशच्या फतेहपूर जिल्ह्यातील किशनपूरच्या एका गावातील महिला बाजारात गेली होती. पण ती घरी परतली नाही. आता या महिलेचा मृतदेह दमहा येथील नाल्याजवळच्या झाडीत आढळला आहे. महिलेच्या हत्येमागचं सत्य समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. महिलेची ज्या प्रकारे हत्या करण्यात आली आहे, ते पाहून पोलिसांनाही हादरा बसला आहे. 

हे ही वाचा >> Breaking News: राष्ट्रवादीत मोठी खळबळ! माणिकराव कोकाटेंबाबत 'हा' निर्णय झाला, स्वत: अजित पवारांनीच CM फडणवीसांना सांगितलं तुम्ही...

प्रियकरासोबत झाडीत जाऊन दारू प्यायली अन्..

तपासात समोर आलं आहे की, महिलेचं प्रेमसंबंध गावात राहणारा तरुण सर्वेशसोबत सुरु होतं. ते दोघेही एका झाडीत झाऊन दारू प्यायले होते. जेव्हा महिला पूर्णपणे दारुच्या नशेत होती, तेव्हा प्रियकर सर्वेशने तिची हत्या केली. तपासात समोर आलं आहे की, प्रियकराने महिलेच्या तोंडावर हल्ला केला. त्यानंतर तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये हात टाकला आणि तिचा खून केला.

हत्येमागचं कारण आलं समोर

पोलिसांनी महिलेचा प्रियकर आरोपी सर्वेशला अटक केली आहे. पोलीस तपासात त्याने खळबळजनक माहिती उघड केली आहे. त्याने म्हटलंय की, महिलेची हत्या करून त्याने त्याच्या वडिलांचा बदला घेतला. या महिलेमुळे वडिलांचा मृत्यू झाला होता, असं त्यानं म्हटलं आहे. आरोपीनं असंही म्हटलं आहे की, त्याच्या वडिलांना याच महिलेनं विष देऊन मारलं होतं. त्यामुळे त्याने हत्येचा कट रचला आणि तिला संपवलं. या संपूर्ण प्रकरणाबाबत फतेहपूरचे एसपी अनूप सिंह यांनी म्हटलंय की, झाडीत महिलेचा मृतदेह आढळला होता. मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत. 

हे ही वाचा >> मुंबईची खबर: कोकण रेल्वेच्या 'रो-रो कार' सेवेला झटका... एका आठवड्यात इतकंच बुकींग!

हे वाचलं का?

    follow whatsapp