Breaking News: राष्ट्रवादीत मोठी खळबळ! माणिकराव कोकाटेंबाबत 'हा' निर्णय झाला, स्वत: अजित पवारांनीच CM फडणवीसांना सांगितलं तुम्ही...
Manikrao Kokate: राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला असल्याचं समजतं आहे. ज्याबाबत स्वत: अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ झाली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील फडणवीस सरकारमधील मंत्री हे सातत्याने वादग्रस्त गोष्टींमुळे विरोधकांच्या हातात आयतं कोलीत देत असल्याचं पाहायला मिळालं आहे. या सगळ्याचा परिणाम सरकारच्या प्रतिमेवर होत असल्याने स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रचंड नाराज असल्याचं समजतं आहे. याच दरम्यान, आता मुख्यमंत्र्यांनी एक मोठा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडींना सुरुवात झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे मंत्री माणिकराव कोकाटे हे मागील काही दिवसांपासून सतत वादात सापडत आहेत. माणिकराव कोकाटे हे विधानसभेत रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून त्यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. त्यानंतर त्यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी सातत्याने मागणी करण्यात यावी. मात्र, आता या सगळ्या प्रकरणी एक मोठा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असल्याचं समजतं आहे.
विधानसभेत ऑनलाइन रमी खेळणं भोवलं, माणिकराव कोकटेंचं खातं काढून घेणार?
माणिकराव कोकाटे यांचा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा अशी विरोधकांकडून सातत्याने मागणी सुरू आहे. मात्र, अद्याप तरी यावर कोणतीही कार्यवाही अजित पवार किंवा मुख्यमंत्र्यांकडून झालेली नाही. पण यामुळे सरकारची प्रतिमा खराब होत असल्याचं चर्चा सुरू झाल्याने आता माणिकराव कोकाटेंबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला असल्याचं बोललं जात आहे.
हे ही वाचा>> CM फडणवीसांना सलग दुसऱ्या दिवशी माणिकराव कोकाटेंवर लागलं बोलावं, मंत्रिपद धोक्यात?
माणिकराव कोकाटे हे विधानसभेत रमी खेळत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला होता. तेव्हापासून सरकारवर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठली होती. अशावेळी आता डॅमेज कंट्रोलसाठी अजित पवारांनी माणिकराव कोकाटे यांच्याकडे असलेलं कृषी खातं काढून त्यांना कमी महत्त्वाचं खातं देण्यात यावं अशा स्वरूपाचं पत्र हे मुख्यमंत्री फडणवीस यांना दिलं आहे.