Pune: Whatsapp चॅट करत असल्याच्या संशयावरुन बापाने दोन्ही मुलींना ट्रकखाली चिरडलं
पुणे: मोठी मुलगी व्हाट्सअॅपवर (Whatsapp) कोणत्या तरी मुलाशी चॅट (Chat) करते म्हणून बापाने पोटच्या दोन्ही मुलींना ट्रकखाली झोपवून त्यांच्या अंगावर ट्रक चालवून त्यांची हत्या (Murder) केल्याची अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे. एवढंच नव्हे तर त्याच चालत्या ट्रकखाली येऊन बापानेही आत्महत्या (Suicide) केल्याची घटना पुणे (Pune) जिल्ह्यातील मावळ (Maval) तालुक्यातील इंदोरी गावात ही घटना घडली […]
ADVERTISEMENT
पुणे: मोठी मुलगी व्हाट्सअॅपवर (Whatsapp) कोणत्या तरी मुलाशी चॅट (Chat) करते म्हणून बापाने पोटच्या दोन्ही मुलींना ट्रकखाली झोपवून त्यांच्या अंगावर ट्रक चालवून त्यांची हत्या (Murder) केल्याची अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे. एवढंच नव्हे तर त्याच चालत्या ट्रकखाली येऊन बापानेही आत्महत्या (Suicide) केल्याची घटना पुणे (Pune) जिल्ह्यातील मावळ (Maval) तालुक्यातील इंदोरी गावात ही घटना घडली आहे.
ADVERTISEMENT
नंदिनी भरत भराटे आणि वैष्णवी भरत भराटे अशी दोन मुलींची नावे असून न तर भरत भराटे असं मुलींची हत्या करणाऱ्या निर्दयी बापाचं नाव असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. याबाबत तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात मयत बापाच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
प्रियकराच्या मदतीने पतीचा खून, पोलिसांनी अशी सोडवली मर्डर मिस्ट्री
हे वाचलं का?
नेमकी घटना काय घडली?
मिळालेल्या माहितीनुसार, नंदिनी ही तिच्या व्हॉट्सअॅपवर कोणत्या तरी मुलाशी चॅटिंग करते आणि त्यामुळेच तिचं वागणं दिवसेंदिवस खराब चाललं आहे. असं भरक भराटे याला वाटत होतं. गेले अनेक दिवसांपासून त्याच्या मनात याविषयी संशय होता. याचाच राग अनावर झाल्याने भरत याने आज (18 एप्रिल) आपल्या दोन्ही मुलींचा जीव घेतला.
ADVERTISEMENT
सुरुवातीला भरतने आपल्या दोन्ही मुलींना रस्त्यावर झोपवले आणि त्यानंतर भरतने त्याच्याच मालकीचा असणारा ट्रक चालू करून तो थेट मुलींच्या अंगावरून नेला. यामध्ये दोन्ही मुलींचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला. जेव्हा मुलींच्या अंगावर भरतने ट्रक नेला त्यानंतर तात्काल ट्रकमधून उडी मारुन तो स्वतः ट्रकच्या खाली आला आणि आत्महत्या केली.
ADVERTISEMENT
प्रेयसीला पेटवणाऱ्या प्रियकराचाच मृत्यू, मुंबईतील खळबळजनक घटना
या संपूर्ण प्रकरणाने पुणे जिल्हाच नव्हे अवघा महाराष्ट्र हादरुन गेला आहे. फक्त मुली व्हॉट्सअॅप चॅट करत असल्याच्या संशयातून बापाने एवढं टोकाचं पाऊल उचललं असल्याने इंदोरी गावातील ग्रामस्थ हे या प्रकरणी प्रचंड संताप व्यक्त करत आहेत. (pune maval father kills two daughters on suspicion of chatting on whatsapp father also commits suicide)
दरम्यान, आता तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा इतर दृष्टीकोनातून देखील तपास सुरु केला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT