पुणे : पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या २२ वारकऱ्यांना दिवेघाटात पोलिसांनी घेतलं ताब्यात
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता यंदाच्या वर्षीही पायी वारी सोहळ्याला परवानगी नाकारण्यात आलेली आहे. तरीही काही वारकरी संघटना या पायी वारीसाठी आग्रही आहेत. पुण्याच्या दिवे घाटात पोलिसांनी शनिवारी पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या २२ वारकऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मानाच्या पालखी सोहळ्यांसाठी महामंडळाच्या बस गाड्यांची सोय केली आहे. या बस गाड्यांमधून ठराविक वारकऱ्यांना […]
ADVERTISEMENT
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता यंदाच्या वर्षीही पायी वारी सोहळ्याला परवानगी नाकारण्यात आलेली आहे. तरीही काही वारकरी संघटना या पायी वारीसाठी आग्रही आहेत. पुण्याच्या दिवे घाटात पोलिसांनी शनिवारी पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या २२ वारकऱ्यांना ताब्यात घेतलं आहे.
ADVERTISEMENT
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मानाच्या पालखी सोहळ्यांसाठी महामंडळाच्या बस गाड्यांची सोय केली आहे. या बस गाड्यांमधून ठराविक वारकऱ्यांना प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. परंतू बंडातात्या कराडकरांसारख्या नेत्यांनी पायी वारीचा आग्रह धरत सरकारी निर्णयाला विरोध केला. अशातच काही वारकरी पंढरपूरच्या दिशेने जाणार असल्याची माहिती लोणी-काळभोर पोलिसांना मिळाली होती.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता २२ वारकरी पंढरपूरच्या दिशेने जाताना दिसले. पोलिसांनी त्यांच्याशी चर्चा केली असता ते पायी पंढरपूरला जाण्यावर ठाम होते. अखेरीस सरकारी नियम समजावून सांगितल्यानंतर या वारकऱ्यांनी पायी वारीचा हट्ट सोडून दिला. यानंतर दिवेघाटात पेट्रोलिंग वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती लोणी-काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिली.
हे वाचलं का?
जगण्याचा अधिकार हा धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकारापेक्षा अधिक महत्वाचा – मद्रास हायकोर्ट
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT