Raj Thackeray Pune Sabha: राज ठाकरे पुण्यातील सभेत उत्तर भारतीयांबाबत काय बोलणार?
पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज (22 मे) पुण्यात सभा घेणार असून अगदी थोड्या वेळातच ते मनसैनिकांना संबोधित करणार आहेत. यावेळी ते प्रामुख्याने आपला अयोध्या दौरा स्थगित का केला यावर बोलणार आहेत. खरं तर राज ठाकरे हे 5 जून रोजी अयोध्याच्या दौऱ्यावर जाणार होते मात्र, अचानक त्यांनी आपण हा दौरा स्थगित केल्याची घोषणा केली. […]
ADVERTISEMENT
पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज (22 मे) पुण्यात सभा घेणार असून अगदी थोड्या वेळातच ते मनसैनिकांना संबोधित करणार आहेत. यावेळी ते प्रामुख्याने आपला अयोध्या दौरा स्थगित का केला यावर बोलणार आहेत. खरं तर राज ठाकरे हे 5 जून रोजी अयोध्याच्या दौऱ्यावर जाणार होते मात्र, अचानक त्यांनी आपण हा दौरा स्थगित केल्याची घोषणा केली. यावर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं. याच सगळ्याला राज ठाकरे नेमकं काय उत्तर देणार याकडे आता अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे.
ADVERTISEMENT
उत्तर भारतीयांबाबत काय बोलणार राज ठाकरे?
राज ठाकरे यांनी आपल्या पक्ष स्थापनेच्या वेळी अतिशय आक्रमकपणे उत्तर भारतीयांविरोधात भूमिका घेतली होती. यावेळी राज ठाकरे यांच्या मनसैनिकांनी अनेकदा उत्तर भारतीयांना चोपही दिला होता. या सगळ्याचा राग अनेक उत्तर भारतीयांमध्ये आजही कायम आहे. असं असताना आता अचानक राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. यातच त्यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली होती.
हे वाचलं का?
या दौऱ्याची घोषणा करताच भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंना सर्वात प्रथम विरोध केला. राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांना जी वागणूक दिली त्याबाबत पुढे येऊन जाहीर माफी मागावी आणि त्यानंतरच अयोध्येत पाय ठेवावा. अन्यथा आम्ही त्यांच्या अयोध्या दौऱ्याला आमच्या पद्धतीने विरोध करु. असा थेट इशाराच बृजभूषण सिंह यांनी दिला आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आतापर्यंत बृजभूषण सिंह यांच्या या वक्तव्यावर एकदाही भाष्य केलेलं नाही किंवा उत्तर भारतीयांबाबत ते काहीही बोलले नाहीत. सध्या मनसेकडून राज ठाकरे हे हिंदूजननायक असल्याचं सातत्याने प्रेझेंट केलं जात आहे. असं असताना राज ठाकरे आता पुण्यातील सभेत उत्तर भारतीयांबाबत काय बोलणार याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
ADVERTISEMENT
आतापर्यंत राज ठाकरे यांनी कायमच उत्तर भारतीयांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पण हिंदुत्वाच्या मुद्द्यानंतर त्यांचा परप्रांतीयाबाबतचा मुद्दा हा काहीसा मवाळ झाला आहे. अशावेळी राज ठाकरे आता कोणत्या मुद्द्यावर नवं राजकारण करणार आणि त्यासाठी काय भूमिका घेणार या सगळ्या गोष्टी आजच्या पुण्यातील सभेतून स्पष्ट होणार आहे.
ADVERTISEMENT
भोंगे, हनुमान चालीसाच्या मुद्द्यांचं काय?
गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना मशिदीवरील भोंगे हटवा अशी मागणी करत राज ठाकरेंनी हा मुद्दा आक्रमकपणे हाती घेतला होता. रमाजन ईदपर्यंत सर्व भोंगे हटवावे अन्यथा आम्ही मशिदीसमोर हनुमान चालीसा लावू अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली होती. यासाठी त्यांनी 4 मेचा अल्टिमेटम देखील दिला होता.
13 अटी घालत मनसेच्या पुण्यातील सभेला परवानगी, राज ठाकरे पालन करणार?
मात्र, महाराष्ट्रात पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेऊन तब्बल 15 हजार मनसैनिकांना नोटीस पाठवल्या होत्या. त्यामुळे हनुमान चालीसा पठण हा राज ठाकरेंचा मुद्दा मनसेला आक्रमक पद्धतीने रेटता आला नाही. त्यामुळे मागील काही दिवसांपासून त्यांचा हा मुद्दा देखील काहीसा मागे पडला असल्याचं दिसतं आहे.
याच सगळ्या मुद्द्यांबाबत राज ठाकरे पुण्यातील सभेत काय बोलणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT