Pornography Case : राज कुंद्राने HotShot App वर बिनधास्त काम कर असा आग्रह धरला होता-शर्लिन चोप्रा
राज कुंद्रा पॉर्न प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने 1500 पानी चार्जशीट दाखल केली आहे. या चार्जशीटमध्ये अभिनेत्री शर्लिन चोप्राचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. राज कुंद्रा हा आपल्याला वारंवार हॉटशॉट या अॅपवर काम करण्यासाठी आग्रह करत होता असं शर्लिन चोप्राने म्हटलं आहे. मुंबई पोलिसांनी जे आरोपपत्र राज कुंद्राच्या विरोधात दाखल केलं आहे त्यामध्ये 58 साक्षीदारांच्या साक्षी […]
ADVERTISEMENT
राज कुंद्रा पॉर्न प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने 1500 पानी चार्जशीट दाखल केली आहे. या चार्जशीटमध्ये अभिनेत्री शर्लिन चोप्राचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. राज कुंद्रा हा आपल्याला वारंवार हॉटशॉट या अॅपवर काम करण्यासाठी आग्रह करत होता असं शर्लिन चोप्राने म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
मुंबई पोलिसांनी जे आरोपपत्र राज कुंद्राच्या विरोधात दाखल केलं आहे त्यामध्ये 58 साक्षीदारांच्या साक्षी आहेत. तसंच शिल्पा शेट्टी, शर्लिन चोप्रा यांचे जबाबही आहेत.
काय म्हटलं आहे शर्लिन चोप्राने?
हे वाचलं का?
आर्म्स प्राई मीडिया प्रा. लि. या कंपनीसोबत माझ्या नावे म्हणजेच The Sherlyn Chopra App बनवण्यासाठी करार केला होता. आर्म्स प्राईम मीडिया प्रा. लि. कंपनीचे डायरेक्टर सौरफ कुशवाह आणि राज कुंद्रा हे दोघे डायरेक्टर होते. The Sherlyn Chopra App या App द्वारे माझे बोल्ड आणि हॉट व्हीडिओज तसंच फोटो प्रसारित केले जात असत. त्याद्वारे मिळणारं उत्पन्न आर्म्स मीडिया कंपनीला येत होते. तसंच ५० टक्के उत्पन्न मला मिळत होते असं सांगण्यात आलं होतं. मात्र शर्लिन चोप्राने सांगितले की तिला कधीच 50 टक्के उत्पन्न मिळाले नाही.
यानंतर राज कुंद्राबाबत शर्लिन चोप्रा जबाबात म्हणाली की, ‘हॉटशॉट या app वर बिनधास्त काम कर. यामध्ये जास्त बोल्ड आणि हॉट व्हीडिओज असणार आहेत. मात्र या App साठी काम करायचे असताना पैशांवरून बोलणी फिस्कटली आणि मी नकार दिला. त्यानंतर सातत्याने राज कुंद्रा आणि त्याच्या कंपनीत काम करणारी क्रिएटिव्ह डायरेक्टर मिता झुनझुनवाला यांनी माझ्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता असंही शर्लिन चोप्राने तिच्या जबाबात म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
काय म्हटलं आहे शिल्पा शेट्टीने?
ADVERTISEMENT
राजने 2015 मध्ये विआन इंडस्ट्रीज लि. नावाची कंपनी सुरू केली. या कंपनीत त्याचे 24.50 टक्के शेअर्स आहेत. सदर कंपनीमध्ये एप्रिल 2015 ते जुलै 2020 या कालावधीत मी संचालक पदावर होते. मात्र नंतर मी या पदाचा राजीनामा दिला. हॉटशॉट अॅप आणि बॉलीफेम या संदर्भात मला काहीही माहित नाही. मी माझ्या कामात व्यस्त असल्याने पती राज कुंद्रा नेमकं काय करत होता हे माहित नाही असं शिल्पा शेट्टीने सांगितलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT