Raj Kundra चा जामीन अर्ज मॅजिस्ट्रेट कोर्टाने फेटाळला

विद्या

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Porn Film प्रकरणात राज कुंद्राला कोणताही दिलासा मिळालेला नाही. त्याचा जामीन अर्ज मॅजिस्ट्रेट कोर्टाने फेटाळला आहे. मंगळवारीच राज कुंद्राची रवानगी 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. राज कुंद्राच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार होती ती झाली असून त्याचा अर्ज फेटाळण्यात आला आहे.अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी सुधीर भाजीपाले यांनी जामीन अर्ज फेटाळला आहे. राज कुंद्राच्या वकिलांनी जेव्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला तेव्हाच मुंबई पोलिसांनी त्याला जामीन मिळू नये म्हणून अर्ज दाखल केला. राज कुंद्राला जामीन मिळू नये असंही मुंबई पोलिसांनी म्हटलं, तसंच राज कुंद्राच्या जामीन अर्जावर आक्षेपही घेतला. आज आता कोर्टाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

ADVERTISEMENT

राज कुंद्राला जामीन मंजूर करू नये, त्याला जामीन मंजूर केला आणि तो घरी गेला तर तिथे जे पुरावे आहेत त्या पुराव्यांशी तो छेडछाड करू शकतो असं या प्रकरणाचे तपास अधिकारी किरण बिडवे यांनी कोर्टाला सांगितलं. एवढंच नाही तर राज कुंद्राच्या विरोधात पॉर्न प्रकरणी आणखी एक तक्रार दाखल झाली आहे असंही बिडवे यांनी कोर्टाला सांगितलं. हे पॉर्न रॅकेटचं प्रकरण आहे आणि त्यातही राज कुंद्राचं नावच पुढे आलं आहे असंही बिडवे यांनी कोर्टाला सांगितलं.

हे वाचलं का?

अॅडव्होकेट आबाद पोंडा यांनी कोर्टाला असं सांगितलं की राज कुंद्रा हा निष्पाप आहे की नाही प्रश्च येत नाही, त्याला जामीन मिळाल्यावर तो काय करू शकतो याचा आहे. राज कुंद्राला जामीन मिळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही त्याला सात वर्षांची शिक्षा कोर्टाने द्यावी अशीही मागणी पोंडा यांनी कोर्टाला केली. त्यानंतर आता राज कुंद्राचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. पॉर्न फिल्म आणि अॅप प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी मागील मंगळवारी जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये राज कुंद्राची सगळी मोडस ऑपरेंडीही समजावून सांगितली. अश्लील व्हीडिओच्या प्रकरणात आत्तापर्यंत 11 जणांना अटक करण्यात आली आहे. राज कुंद्राला अटक केल्यानंतर आणखी एकाला पोलिसांनी अटक केली.

ADVERTISEMENT

राज कुंद्राचं पहिलं लग्न कविता नावाच्या मुलीशी झालं होतं. मात्र 2009 मध्ये राज कुंद्रा आणि कविता यांचा घटस्फोट झाला. या दोघांना डिलीना नावाची एक मुलगी आहे. 2007 मध्ये राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांची ओळख झाली. कवितासोबत घटस्फोट झाल्यानंतर शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी लग्न केलं. या दोघांनी नोव्हेंबर 2009 मध्ये लग्न केलं. या दोघांना विवान आणि समीक्षा नावाची दोन मुलं आहे.

राज कुंद्राने ऑनलाईन टीव्ही प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक केली होती. बेस्ट डिल टीव्ही असं या प्लॅटफॉर्मचं नाव होतं. मात्र राज कुंद्राचा हा व्यवसायही कायदेशीर अडचणींमध्ये अडकला. 2012 मध्ये राज कुंद्राने सुपर लीग फाईट केली होती. त्यावेळी अभिनेता संजय दत्त हा राज कुंद्राचा पार्टनर होता. मात्र या लीगने बस्तान बसवण्याआधीच गाशा गुंडाळला. राज कुंद्रा हा युकेमधील ट्रेडकॉप लिमिटेड कंपनीचा सीईओही आहे.

बिटकॉईन घोटाळा झाला तेव्हाही राज कुंद्राचं नाव पुढे आलं होतं. याप्रकरणी 2018 मध्ये राज कुंद्राला ईडीने समन्स बजावलं होतं. जून 2018 मध्ये राज कुंद्राची ईडीकडून कसून तपासणीही करण्यात आली होती. 2017 मध्ये राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी या दोघांचं नाव चर्चेत होतं कारण या दोघांनी ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून एका व्यापाऱ्याला लाखोंचा गंडा घातल्याचं प्रकरण तेव्हा समोर आलं होतं. त्यावेळी राज कुंद्रा, शिल्पा शेट्टी आणि त्यांच्या तीन साथीदारांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT