देशात दोन राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न; चंद्रकांत पाटील यांचं विधान

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज ठाकरे यांच्या ठाण्यातील भाषणावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज भाष्य केलं. आज झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना पाटील यांनी राज ठाकरे यांनी उचललेल्या मागण्यांना पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर मनसे भाजपची बी टीम नसल्याचं स्पष्ट करत वेळ आली, तर राज ठाकरे भाजपवरही कठोर टीका करतील, असं ते म्हणाले.

ADVERTISEMENT

राज ठाकरेंच्या भूमिकेबद्दल बोलताना पाटील म्हणाले, “राज ठाकरेंचं भाषण टप्प्याने ऐकायला मिळालं. भाजपची बी टीम असा आरोप झाला. महाविकास आघाडीने एखादी खोटी गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक परिसंस्था तयार केली आहे.”

“म्हणजे ठाण्यात जितेंद्र आव्हाडांनी बोलायचं, पुण्यात अजित पवारांनी बोलायचं, मग कुठेतरी सुप्रिया सुळे… आणि एकच बोलायचं. त्यामुळे इको तयार होतो. त्यात आता आदित्य ठाकरेही आले आहेत. लोकांना खरं वाटले असा तो विषय बिंबवायचा. राज ठाकरेंच्या पाडवा मेळाव्यानंतर मनसे बी टीम असल्याचं रुजवण्याचा प्रयत्न केला गेला,” असं पाटील यांनी सांगितलं.

हे वाचलं का?

“राज ठाकरेंनी यावर सडेतोड उत्तर दिलं आहे. नरेंद्र मोदी जेव्हा गुजरातमध्ये विकास कामं करत होते, तेव्हा गुजरात गेलो आणि ते बरं वाटलं. मध्ये त्यांची काही धोरणं पटली नाही, त्यावर टीका केली.”

“आता ३७० कलम रद्द केल्यानंतर या देशातील कुठला देशभक्त नागरिक त्यांचं अभिनंदन करणार नाही. उद्या ते चुकले तर त्यांच्यावरही बोलेल. आता तुम्ही चुकता आहात, तुमच्यावर बोलतोय. हा त्यांचा मुद्दा आहे. मला स्पष्ट सांगायचं आहे की, ते स्वतंत्र व्यक्तीमत्व आहे. ते कुणाची बी टीम म्हणून काम करणार नाहीत,” असं पाटील यावेळी म्हणाले.

ADVERTISEMENT

‘शरद पवार नास्तिक आहेत त्यामुळेच ते….’ राज ठाकरेंचा निशाणा

ADVERTISEMENT

“हिंदुत्वाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. हा मुद्दा भाजपला नव्याने घ्यावा लागणार नाही. तो भाजपचा श्वास आहे. भाजपचा आत्मा आहे. १९५१ साली जेव्हा जनसंघाची स्थापना झाली. त्यादिवशी श्यामा प्रसाद मुखर्जींनी एका देशात दोन संविधान, दोन निशाण चालणार नाही, असं म्हटलं होतं.”

“आता सगळे बोलत आहेत. त्यामुळे आमची नेहमी घोषणा राहिली की, ‘जहा हुए बलिदान मुखर्जी वो कश्मीर हमारा है।’ त्यामुळे अलिकडच्या काळात राजकीय कारणाने अनेकांनी अयोध्येतील मशिद आम्ही तोडल्याचं सांगत श्रेय घेण्याच प्रयत्न चालवला आहे,” असा टोला पाटलांनी शिवसेनेला लगावला आहे.

“वारसा प्रबोधनकारांचा, विचारसरणी गोडसेची”; राज ठाकरेंना सेना-राष्ट्रवादी-काँग्रेसनं काय दिलं उत्तर?

“श्रेय घेतल्याच्या निमित्ताने तरी हे मुद्दे सगळ्यांचे होत आहेत. हे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला अपेक्षित आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे मुद्दे लावून धरून लावणार नाहीत. राज ठाकरेंनी मांडलेली भूमिका देशाच्या एकतेच्या दृष्टीने कारण एका देशात दोन राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय त्यामुळे अशी भूमिका आवश्यक आहे.”

“राज ठाकरे भाजपची बी टीम नाही. ते स्वतंत्र आहेत. उद्या ते इतकीच कठोर टीका भाजपवर करतील. त्यांनी जो हिंदुत्वाचा मुद्दा मांडला आहे, तो भाजपच्या जन्मापासूनचा आहे. आता जे-जे हिंदुत्वाचा मुद्दा मांडतील. यात मुस्लिमांचं लांगुनचालन नाही आणि मुस्लिमांवर आक्रमणही नाही.”

“राज ठाकरेंनी जो मुद्दा मांडला की, मी धर्मवेडा नाही, पण धर्माभिमानी आहे. मशिदीत जाण्याला, नमाज पठाणाला कुणाचा विरोध आहे? त्यांचंही म्हणणं नसेल आणि आमचंही नाही. हिंदू मंदिरात जातो, ख्रिश्चन चर्चमध्ये जातात, त्यांनी मशिदीत जावं. एकमेकांच्या धर्माबद्दल आदर केला पाहिजे,” असं पाटील म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT