Zika Virus चा पहिला रूग्ण पुण्यात, महाराष्ट्राची काळजी वाढली का? राजेश टोपे म्हणतात…
Zika व्हायरसचा पहिला रूग्ण पुण्यातल्या पुरंदर तालुक्यात आढळला आहे. हा रूग्ण म्हणजे एक पन्नास वर्षांची महिला आहे. झिका व्हायरस एडिस नावाच्या डासापासून त्याचं संक्रमण होतं. त्याबाबत NIV ने खूप डिटेल तपासणी केल्यानंतर तो व्हायरस झिका व्हायरसच आहे ते सिद्ध झालं आहे. झिकाची लक्षणं असतात ते म्हणजे ताप येणे, डोळे लाल होणे, अंगदुखी. मात्र फार काळजी […]
ADVERTISEMENT
Zika व्हायरसचा पहिला रूग्ण पुण्यातल्या पुरंदर तालुक्यात आढळला आहे. हा रूग्ण म्हणजे एक पन्नास वर्षांची महिला आहे. झिका व्हायरस एडिस नावाच्या डासापासून त्याचं संक्रमण होतं. त्याबाबत NIV ने खूप डिटेल तपासणी केल्यानंतर तो व्हायरस झिका व्हायरसच आहे ते सिद्ध झालं आहे. झिकाची लक्षणं असतात ते म्हणजे ताप येणे, डोळे लाल होणे, अंगदुखी. मात्र फार काळजी करण्याचा हा विषय नाही कारण या व्हायरसच्या प्रादुर्भावात मृत्यूचं प्रमाण कमी आहे. जी लक्षणं आहेत त्यावर आधारीत उपचार करावा लागतो. त्यानुसार जी कार्यवाही करायची आहे ती केली जाते आहे. एडिस डासांची उत्पत्ती साठलेल्या गोड पाण्यावर होतो. तसं ते साठवलं जाऊ नये याची काळजी पुरंदर आणि आजूबाजूच्या गावांमध्ये घेतली जाते आहे. इतरही योग्य पावलं आरोग्य विभागाकडून टाकली जात आहेत. तसा काळजीचा आज विषय नाही असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
पुरंदर तालुक्यातल्या बेलसर आणि परिंचे या भागात जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच ताप असलेले रुग्ण आढळून येत होते. त्यातील पाच रुग्णांचे नमुने 16 जुलै रोजी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी तीन जणांना चिकुनगुनिया या आजाराचे निदान झाले. त्यानंतर राष्ट्रीय विज्ञान संस्थेच्या डेंगू आणि चिकुनगुनिया विभागाचे प्रमुख डॉ. योगेश गुरव यांच्या नेतृत्वाखालील टीमने बेलसर आणि परिंचे भागातील आणखी काही 41 रुग्णांचे नमुने तपासणीसाठी नेले.
या नमुन्यांमधील 27 जणांना चिकुनगुनिया तर तीन जणांना डेंगूची लागण झाल्याचं अहवालावरून स्पष्ट झाले. मात्र बेलसर येथील एका 50 वर्षीय महिलेला झिका या विषाणूजन्य आजाराची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. 30 जुलै रोजी या महिलेचे रक्ताचे नमुने घेऊन तपासणी करण्यात आली होती. महाराष्ट्रात (Maharashtra) झिका विषाणूची आढळलेली ही पहिलीच रुग्ण आहे. ही महिला चिकुनगुनिया बाधित देखील असल्याचे स्पष्ट झाले असल्याने हा मिश्र विषाणू संसर्ग आहे. दरम्यान, ही माहिती समोर येताच पुण्यासह अवघ्या महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. मात्र झिका व्हायरसपासून होणारा जो रोगाचा प्रादुर्भाव आहे त्यात मृत्यू दर कमी आहे त्यामुळे तसा काळजीचा विषय आज तरी नाही असं राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
हे वाचलं का?
दुसरीकडे राज्यात पहिल्यांदाच झिका या विषाणूचा रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. झिका व्हायरचा रुग्ण मिळाल्याचे समजताच राज्यस्तरीय शीघ्र प्रतिसाद पथकाने बेलसर गावातील परिस्थितीची तात्काळ पाहणी केली. झिका विषाणूने बाधित असलेली महिलेची तब्येत चांगली असल्याचे राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉक्टर प्रदीप आवटे यांनी सांगितले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT