परवानगीशिवाय रश्मी शुक्लांनी फोन टॅप केले, नंतर मुख्यमंत्र्यांसमोर रडल्या – जितेंद्र आव्हाड
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर महाविकास आघाडी सरकार बॅकफूटला ढकललं गेलं होतं. परमबीर सिंग यांनी आपल्या पत्रामध्ये रश्मी शुक्ला यांनी ऑगस्ट महिन्यात लिहीलेल्या एका पत्राचा दाखला दिला आहे. राज्याच्या गुप्तचर आयुक्तपदी काम करत असताना रश्मी शुक्ला यांनी काही फोन टॅप केले होते. पोलिसांच्या बदलीसाठी काही राजकीय संबंध […]
ADVERTISEMENT
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर महाविकास आघाडी सरकार बॅकफूटला ढकललं गेलं होतं. परमबीर सिंग यांनी आपल्या पत्रामध्ये रश्मी शुक्ला यांनी ऑगस्ट महिन्यात लिहीलेल्या एका पत्राचा दाखला दिला आहे. राज्याच्या गुप्तचर आयुक्तपदी काम करत असताना रश्मी शुक्ला यांनी काही फोन टॅप केले होते. पोलिसांच्या बदलीसाठी काही राजकीय संबंध असलेले दलाल काम करत आहेत…यासंदर्भातल्या तक्रारी आल्यानंतर आपण काही फोनही टॅप केल्याचं रश्मी शुक्ला यांनी आपल्या अहवालात म्हटलं होतं.
ADVERTISEMENT
परंतू रश्मी शुक्ला यांना अशाप्रकारे फोन टॅप करण्याची परवानगीच नव्हती अशी माहिती महाविकास आघाडी सरकारमधले मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. राज्याचे सध्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी आम्हाला सांगितल्याप्रमाणे शुक्ला यांना फोन टॅपिंगची परवानगी नव्हती. ही बाब लक्षात आल्यानंतर रश्मी शुक्ला या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांसमोर रडल्याही…यानंतर आम्ही मानवतेच्या आधारावर त्यांना माफ केलं. पण आता रश्मी शुक्ला तिच माहिती सरकारची प्रतिमा मलिन करण्यासाठी वापरत आहेत अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली. बुधवारी कॅबिनेटची बैठक झाल्यानंतर आव्हाड यांनी मीडियाशी बोलताना माहिती दिली.
Phone Tapping अत्यंत गंभीर, रश्मी शुक्लांनी केली महाराष्ट्राची बदनामी-जितेंद्र आव्हाड
हे वाचलं का?
रश्मी शुक्ला यांनी आपल्या अहवालात ज्या बदल्यांचा उल्लेख केला आहे तशा बदल्या झाल्याच नाहीत. हा एक कट आहे. त्यांनी एक फोन टॅप करण्याची परवानगी घेतली होती, पण नंतर दुसराच फोन टॅप केला. आम्हाला असा संशय आहे की त्या काही मंत्र्यांचे फोनही टॅप करत होत्या. मी देखील काही दिवसांपूर्वी असं ट्विट केलं होतं की माझा फोन टॅप होत असल्याचा मला संशय आहे. कॅबिनेट बैठकीत यासदंर्भात चर्चाही झाली आणि अनेक मंत्र्यांनी याविरोधात आपली नाराजी व्यक्त केली. अनेक मंत्र्यांनी शुक्लाविरोधात कारवाई अशीही मागणी केल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.
हिरेन प्रकरणाचा तपास थांबवा, ठाणे कोर्टाचा ATS ला आदेश
ADVERTISEMENT
रश्मी शुक्ला यांनी ऑगस्ट २०२० ला लिहिलेल्या पत्रात नेमकं काय म्हटलं आहे?
ADVERTISEMENT
पोलिसांच्या बदलीसाठी काही राजकीय संबंध असलेले दलाल काम करत आहेत यासंदर्भातल्या तक्रारी आल्यानंतर आणि आरोप झाल्यानंतर मी हे संपूर्ण प्रकरण तपासलं. त्यासाठी काही फोनही टॅप केले. जाणीवपूर्वक काही फोन नंबर हे सर्व्हिलन्सवर होते. ज्यासाठीची मी रितसर परवानगी घेतली होती. या फोन टॅपिंग आणि इतर गोळा केलेल्या माहितीनंतर काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. यासंदर्भातली माहिती आपण तातडीने मुख्यमंत्र्यांना द्यायला हवी असं मला वाटतं आहे. जे आरोप झाले ते धक्कादायक आहेत आणि समोर आलेलं वास्तवही जळजळीत सत्य आहे.
पोलिसांच्या बदल्याचं रॅकेट आणि त्यासाठी काम करणारे काही दलाल कार्यरत आहेत. या सगळ्यांचा जवळचा संबंध काही राजकारण्यांशी आहे. हे देखील समोर आलं आहे. बदल्यांसाठी काम करणाऱ्या ब्रोकर्सचं रॅकेट आहे ही गंभीर बाब समोर आली आहे. यामध्ये पोलीस निरीक्षकापासून ते मोठ्या पदांपर्यंतच्या बदल्यांचा समावेश आहे.
जो डेटा आणि माहिती समोर आली आहे त्यामध्ये असंही समोर आलं आहे की अशा प्रकारची परिस्थिती २०१७ मध्येही निर्माण झाली होती. त्या प्रकरणी या संदर्भात सखोल चौकशी करून ४०२, ४१९, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १७०, ५११, ३४ या आयपीसीच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हा सात जणांना अटकही करण्यात आली होती. या अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक असलेला नवाज हा पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे.
हे संपूर्ण प्रकरण हे मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातलं गेलं पाहिजे. तसंच या प्रकरणातले जे दोषी आहेत त्यांच्या संबंधी योग्य ती कठोर कारवाई करण्यात आली पाहिजे. पोलीस दलातल्या नियुक्त्यांसाठी हे अशा प्रकारचं दलालांचं रॅकेट असणं योग्य नाही त्यामुळे पोलिसांची प्रतिमा डागाळली जाते. आपण माझ्या या पत्रातील मुद्द्यांचा बारकाईने विचार करून या सर्व बाबी तातडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कळवाव्यात.
या आशयाचं पत्र रश्मी शुक्ला यांनी महाराष्ट्र पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल यांना लिहिलं होतं. पोलीस दलातल्या बदल्यांचं रॅकेट कसं चालतं आणि त्यामध्ये काही दलाल काम करत आहेत अशी माहिती महाराष्ट्र शासनाच्या गुप्तचर विभागाला मिळाली होती. त्यानंतर या विभागाच्या आयुक्त यांनी काही फोन टॅप केले होते. या फोन टॅपिंगनंतर आलेल्या माहितीनंतर रश्मी शुक्ला यांनी हे पत्र पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल यांना लिहिलं होतं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT