अकोल्यात मुसळधार पाऊस, पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात यश
एकीकडे मुंबई आणि नजिकच्या परिसरात पावसाने दमदार हजेरी लावलेली असताना विदर्भात अकोल्यामध्येही पावसाने दमदार बॅटींग केली आहे. नागपूर आणि पुणे हवामान विभागाने अकोल्याला अतिवृष्टीचा धोका सांगितला आहे. काल संध्याकाळपासून अकोल्यात पावसाने हजेरी लावली. ज्यामुळे न्यू तापडीया नगर परिसरातील नाला दुधडी भरुन वाहू लागला. या नाल्याला पूर आल्यामुळे काही भागही वाहून गेला. ज्यामुळे दुसऱ्या बाजूला असलेल्या […]
ADVERTISEMENT
एकीकडे मुंबई आणि नजिकच्या परिसरात पावसाने दमदार हजेरी लावलेली असताना विदर्भात अकोल्यामध्येही पावसाने दमदार बॅटींग केली आहे. नागपूर आणि पुणे हवामान विभागाने अकोल्याला अतिवृष्टीचा धोका सांगितला आहे. काल संध्याकाळपासून अकोल्यात पावसाने हजेरी लावली. ज्यामुळे न्यू तापडीया नगर परिसरातील नाला दुधडी भरुन वाहू लागला.
ADVERTISEMENT
या नाल्याला पूर आल्यामुळे काही भागही वाहून गेला. ज्यामुळे दुसऱ्या बाजूला असलेल्या वस्तीतील नागरिक अडकून बसले. त्यात पावसाची संततधार कायम असल्यामुळे अनेक घरांमध्ये पाणीही शिरलं. अखेरीस नगरसेवक विजय अग्रवाल आणि अग्नीशमन दलाच्या जवानांनी दोर बांधून या भागातील नागरिकांना बाहेर काढलं.
हे वाचलं का?
पुरामुळे या नाल्याचा प्रवाह इतका मोठा होता की आजुबाजूच्या घरांमध्ये पाणी शिरलं. पाण्याचा प्रवाह पाहता नागरिक घराबाहेर पडण्याची जोखीम उचलू शकणार नव्हते. अनेकांनी संपूर्ण रात्र घरातच किंवा आजुबाजूच्या परिसरात काढली. अखेरीस सकाळी अग्निशमन दलाच्या जवानांनी या नागरिकांना बाहेर काढलं.
अकोला जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा, ७७ गावांना बसू शकतो पुराचा फटका
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT