रेल्वे परीक्षा घोटाळा: विद्यार्थ्यांचा प्रचंड गोंधळ, पॅसेंजर ट्रेनला लावली आग; स्टेशनवर दगडफेक
गया (बिहार): बिहारमध्ये रेल्वे भरती बोर्ड (RRB)ने RRB NTPC CBT 2 आणि गट D CBT 1 परीक्षांचा निकालांवरुन सलग तिसऱ्या दिवशी उमेदवारांचा विरोध सुरूच आहे. आजही अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी ट्रेन पेटवून दिल्या. याआधी काल पाटणा, सीतामढी, मुझफ्फरपूर, आरा, बक्सरमध्ये गोंधळ झाला होता. रेल्वे मंत्रालयातील रिक्त पदासाठी घेण्यात आलेल्या आरआरबी एनटीपीसी परीक्षेच्या निकालात घोटाळ्या कऱण्यात आल्याचा […]
ADVERTISEMENT
गया (बिहार): बिहारमध्ये रेल्वे भरती बोर्ड (RRB)ने RRB NTPC CBT 2 आणि गट D CBT 1 परीक्षांचा निकालांवरुन सलग तिसऱ्या दिवशी उमेदवारांचा विरोध सुरूच आहे. आजही अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी ट्रेन पेटवून दिल्या. याआधी काल पाटणा, सीतामढी, मुझफ्फरपूर, आरा, बक्सरमध्ये गोंधळ झाला होता.
ADVERTISEMENT
रेल्वे मंत्रालयातील रिक्त पदासाठी घेण्यात आलेल्या आरआरबी एनटीपीसी परीक्षेच्या निकालात घोटाळ्या कऱण्यात आल्याचा आरोप बिहारमधील विद्यार्थ्यांकडून केला जात आहे. याविरोधात विद्यार्थ्यांनी बिहारमधील विविध रेल्वे स्थानकांवर आंदोलनही सुरू केलं आहे.
हे वाचलं का?
मंगळवारी सीतामढीमध्ये तोडफोड आणि दगडफेक करणाऱ्या जमावाला पोलिसांनी हवेत गोळीबार करून दूर सारलं होतं. प्रचंड विरोध पाहता, रेल्वेने बुधवारी सकाळीच एनटीपीसी आणि ग्रुप डी (श्रेणी-१) परीक्षा स्थगित करण्याची घोषणा केली होती. मात्र रेल्वेच्या या निर्णयानंतरही विद्यार्थ्यांचा संताप थांबलेला नाही. संपूर्ण बिहारमध्ये विद्यार्थ्यांची संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे.
ADVERTISEMENT
गयामध्ये गोंधळ, ट्रेनवर दगडफेक
ADVERTISEMENT
आज (26 जानेवारी) गयामध्येही विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. गया रेल्वे स्थानक परिसरात विद्यार्थ्यांनी चालत्या ट्रेनवर दगडफेक केली. दुसरीकडे, संतप्त विद्यार्थ्यांनी यार्डात उभी असलेली पॅसेंजर ट्रेन पेटवून दिली. जळत्या ट्रेनच्या बोगीतील आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं होतं.
घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त हजर आहे. मात्र आंदोलक विद्यार्थ्यांसमोर पोलिसांना नियंत्रण मिळवता आलं नाही. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी अनेक ट्रेनला लक्ष्य केलं आहे. श्रमजीवी एक्स्प्रेसचेही विद्यार्थ्यांनी मोठे नुकसान केले आहे.
यावेळी संतप्त विद्यार्थ्यांनी भभुआ-पाटणा इंटरसिटी एक्स्प्रेसच्या बोगीला आग लावली. पोलिसांनी विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी बळाचा वापर केला, मात्र विद्यार्थी वेळोवेळी गोंधळ घालत आहेत आणि पोलिसांवर दगडफेकही करत आहेत. गया एसएसपी आदित्य कुमार यांच्यासह आरपीएफ आणि रॅपिड अॅक्शन फोर्सचे जवानही घटनास्थळी उपस्थित आहेत.
जहानाबादमध्ये रेल्वे रुळावर फडकवला तिरंगा
जेहानाबादमध्ये सकाळी विद्यार्थ्यांनी पाटणा-गया पॅसेंजर ट्रेन जेहानाबाद स्टेशनवर थांबवून जोरदार निषेध करण्यात आला. विद्यार्थ्यांनी रेल्वे ट्रॅकवर ध्वजारोहण करून राष्ट्रगीत देखील गायलं. रेल्वे, आरआरबी आणि एनटीपीसीच्या निकालात मोठ्या प्रमाणात तफावत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. तसेच विद्यार्थ्यांमधील CB-2 काढून टाकण्याची मागणी केली.
RRB NTPC CBT 2 आणि गट D CBT 1 परीक्षा स्थगित
यूपी-बिहारमधील विद्यार्थ्यांच्या तीव्र निषेधानंतर रेल्वे भरती बोर्डाने RRB NTPC CBT 2 आणि गट D CBT 1 परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच बोर्डाने विद्यार्थ्यांच्या स्वयंसेवकांसह एक समितीही स्थापन केली असून, ही समिती निकालाचा फेरविचार करणार आहे. त्यानंतर पुन्हा परीक्षा घेतल्या जातील.
विद्यार्थ्यांच्या समस्यांवर हायप्रोफाइल समिती विचार करेल. या समितीचे सदस्य असतील-
1. दीपक पीटर, अध्यक्ष प्रधान कार्यकारी संचालक (औद्योगिक संबंध), रेल्वे बोर्ड
2. राजीव गांधी, सदस्य सचिव, कार्यकारी संचालक आस्थापना (RRB), रेल्वे बोर्ड
3. आदित्य कुमार सदस्य, मुख्य कार्मिक अधिकारी (प्रशासन), पश्चिम रेल्वे
4. जगदीश अलगर, अध्यक्ष आरआरबी/चेन्नई
5. मुकेश गुप्ता, अध्यक्ष आरआरबी/भोपाळ
रेल्वे भरती परीक्षेत घोटाळा?; संतप्त विद्यार्थ्यांकडून पोलिसांवर दगडफेक, रेल्वे सेवेला फटका
नेमकं प्रकरण काय?
आरआरबीने १३ जागांसाठी परीक्षा घेतली होती. रेल्वे भरती मंडळाकडून नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी भरती अर्थात सीबीटी-१ परीक्षेचा निकाल १४ व १५ जानेवारी २०२२ रोजी घोषित केला. एक कोटीपेक्षा अधिक उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यामुळे सीबीटी-२ म्हणजेच दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारांची निवड करणं अपेक्षित होतं. यावरून विद्यार्थ्यांकडून परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप केला जात आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT