‘आपले कार्यक्षम राज्यपाल कोठे आहेत?’; भगतसिंह कोश्यारींना ‘रोखठोक’मधून चिमटे
महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातला सुप्त संघर्ष बघायला मिळाला. वेगवेगळ्या मुद्द्यांवरून भगतसिंह कोश्यारींनी उद्धव ठाकरेंना पत्र पाठवली होती आणि या पत्रांना मुख्यमंत्र्यांकडून उत्तरं दिली गेली होती. त्यामुळे सरकार आणि राजभवनात सातत्यानं खटके उडाताना दिसले. मात्र, सध्या राज्यपाल चर्चेत नाहीत. यावरूनच आता सामनातल्या ‘रोखठोक’मधून कोपरखळी लगावली आहे. […]
ADVERTISEMENT
महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातला सुप्त संघर्ष बघायला मिळाला. वेगवेगळ्या मुद्द्यांवरून भगतसिंह कोश्यारींनी उद्धव ठाकरेंना पत्र पाठवली होती आणि या पत्रांना मुख्यमंत्र्यांकडून उत्तरं दिली गेली होती. त्यामुळे सरकार आणि राजभवनात सातत्यानं खटके उडाताना दिसले. मात्र, सध्या राज्यपाल चर्चेत नाहीत. यावरूनच आता सामनातल्या ‘रोखठोक’मधून कोपरखळी लगावली आहे.
ADVERTISEMENT
खासदार संजय राऊत हे लिहित असलेलं सामनातलं ‘रोखठोक’ सदर सध्या ‘कडकनाथ मुंबैकर’ यांच्या नावे प्रसिद्ध होतं. यावेळच्या रोखठोकमधून थेट राज्यपालांवर निशाणा साधण्यात आलाय. रोखठोकमध्ये म्हटलंय की, ‘महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सध्या कुठे भूमिगत झाले आहेत याबाबत कोणी खुलासा करेल काय? मुळात आपले राज्यपाल राजभवनात आहेत की नाहीत, ते गृहमंत्री फडणवीस यांनी जनतेसमोर आणावं.”
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कोण कोणत्या वादांमुळे चर्चेत राहिले?
हे वाचलं का?
वादग्रस्त विधानांवरून भगतसिंह कोश्यारींना टोला
“ठाकरे सरकारच्या काळात सध्याच्या राज्यपाल महोदयांची काम करून दमछाक होत होती. पूरस्थितीत स्वतंत्र दौरे काढून प्रशासनास वेगळ्या सूचना देत होते. इतर अनेक प्रशासकीय कामांत त्यांचा थेट हस्तक्षेप होता. मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात त्यांचे मन साफ नव्हते व मंत्र्यांना राजभवनावर बोलवून ते सल्ले व सूचना देत होते. महाराष्ट्रातील महिला सुरक्षा, कायदा सुव्यवस्था, विद्यापीठांचा कारभार याबाबत ते कमालीचे जागरूक होते. शिवाजी महाराजांपासून सावित्रीबाई फुले यांच्यापर्यंत वादग्रस्त विधान करून ते खळबळ माजवीत होते. ते आपले कार्यक्षम राज्यपाल आज कोठे आहेत?”, असा चिमटा रोखठोकमधून काढण्यात आला आहे.
“त्यांचे (भगतसिंह कोश्यारी) ज्ञान, अनुभव यांचे मार्गदर्शन शिंदे, फडणवीसांच्या सरकारला होऊ नये याचे आश्चर्यच वाटते. सत्य असे आहे की, राजभवनाने आता लुडबुड करू नये, निवृत्तीबुवांसारखे राहावे हा राजकीय आदेश राज्यपाल महोदय पाळीत आहेत. राज्यपालांकडे खरोखरच काही काम उरले नसेल तर मुंबईतील भाजप नेत्यांच्या ‘डॉक्टरेट’ पदव्यांच्या चौकशींचे आदेश तरी त्यांनी द्यावेत”, असं म्हणत रोखठोकमधून किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्यांच्या पी.एचडी पदवीकडे लक्ष वेधण्यात आलंय.
ADVERTISEMENT
“मराठी माणसाला डिवचू नका” राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना राज ठाकरेंचा इशारा
ADVERTISEMENT
राज्यपाल लंवगी फटाके फोडण्याच्या मनःस्थितीत नाहीत; रोखठोकमधून टीका
“एकंदरीत राज्यपाल या दिवाळीत कोणतेही लवंगी फटाके फोडण्याच्या मनःस्थितीत नाहीत. महाराष्ट्राचा शेतकरी महाप्रलयात गटांगळय़ा खातो आहे. त्याची पिके वाहून गेली. त्याला सरकारी मदत मिळालेली नाही. मात्र राज्यपालांनी शेतकऱ्यांच्या या आक्रोशाची दखल घेतलेली नाही. अर्थात, राज्यपालांनी अशी दखल घ्यायला राज्यात सध्या काय ठाकऱ्यांचे सरकार सत्तेवर आहे? राज्यपालांची ही दिवाळी तशी थंडच दिसते”, अशी टीका रोखठोकमधून करण्यात आलीये.
“राज्यपाल व शिंदे-फडणवीस सरकारच्या माहितीसाठी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली एक बातमी देतो व विषय संपवतो. ‘सेनगाव तालुक्यातील (जि. हिंगोली) गारखेडा परिसरात अतिवृष्टीमुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी पत्र पाठवून चक्क आपले गावच विक्रीस काढले आहे. गावविक्रीचा तसा फलक त्यांनी गावात लावला आहे!’ ही तर सुरुवात आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन शेतकऱ्यांचे हे गाव विकत घेईल काय?”, असा उपहासात्मक सवालही रोखठोकमधून करण्यात आलाय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT