नील सोमय्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळताच राऊत म्हणाले, ‘अधिवेशन संपू द्या’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सोमय्यांवर तोफ डागली. साडेतीन लोकांची नावं सांगितली, तर ते अटकपूर्व जामीन मिळवतील, असं म्हणत राऊतांनी सोमय्या पितापुत्र तुरुंगात जात आहेत, असा इशारा दिला.

ADVERTISEMENT

मुंबईत माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, “हळूहळू समोर येईल. जर कोणतीही चूक नाहीये, कोणताही गुन्हा नाहीये. तर बापलेक अटकपूर्व जामीनासाठी का पळता आहेत. आतापर्यंत तर धावपळ होत नव्हती. जेव्हापासून मी सत्य समोर आणण्याचा प्रयत्न केला. तेव्हापासून बापलेक अटकपूर्व जामीनासाठी दारोदार ठोकरा का खात आहेत?”

संजय राऊत यांनी फ्रंटमॅन म्हणून नाव घेतलेले जितेंद्र नवलानी आहेत कोण?

हे वाचलं का?

“एका न्यायालयातून दुसऱ्या न्यायालयात जात आहेत. अटकपूर्व जामीनाची गरज तुम्हाला का पडत आहे? यात सगळं स्पष्ट आहे. मी जे साडेतीन लोक बोललो ना, तेही मोजत रहा. नाव सांगितलं तर ते अटकपूर्व जामीन घेतात. जसंजसे आत जातील, तसे आपण बघत रहा.”

“मी आज म्हणालो आहे की, माझे शब्द लिहून ठेवा. बापलेक (किरीट सोमय्या-नील सोमय्या) आणि आणखी काही लोक, जे मोठंमोठ्या गप्पा करतात. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करतात. ते सगळे तुरुंगात जात आहेत. महारष्ट्र सरकार, तपास यंत्रणा आणि पोलीस चौकशी करण्यासाठी सक्षम आहेत.”

ADVERTISEMENT

‘जो मैं बोलता हूँ वो मै करता हूँ, जो नहीं बोलता वो….’ संजय राऊत यांचा फिल्मी अंदाज

ADVERTISEMENT

“मी वारंवार सांगतोय बापलेक तुरुंगात जाणार. तुम्ही आतापर्यंत इतरांना धमक्या देत होतात. याला तुरुंगात पाठवू त्याला तुरुंगात पाठवू. मग तुम्ही अटकपूर्व जामीनासाठी धावपळ का करत आहात? आतापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. कोणत्या गुन्ह्याखाली अटक होणार आहे, हे स्पष्ट नाही.”

“न्यायालयाने विचारलंय आणि सरकारने सांगितलं आहे की, पीएमसी बँक घोटाळ्यात तुम्हाला अटकेची भीती वाटत असेल, तर तसं सांगा. हे सरकारी वकिलांनी विचारल्याचं मी वाचलं. किरकोळ केस आहे, पण तुरुंगात जाणार. हे एक प्रकरण नाही. अशी अनेक प्रकरणं आहेत, ज्यात हे बापबेटे तुरुंगात जातील. यांच्याबरोबर अनेक अधिकारी, तपास यंत्रणा यांनी इथे जे घोटाळे करून ठेवलेत, ही प्रकरण मी पुराव्यासह पंतप्रधान कार्यालयसमोर ठेवली आहेत. अधिवेशन संपलं की सांगेन.”

“ज्या अधिकाऱ्यांना असं वाटतंय की त्यांचं राज्य आहे केंद्रात, ते भ्रमात आहेत. महारष्ट्र सरकारच्या तपास यंत्रणांनाही महाराष्ट्रात झालेल्या भ्रष्टाचारावर, खंडणीवर, इतर गोष्टींबद्दल तपास करून आरोपींना अटक करण्याचा अधिकार आहे. त्यांना मी हे सांगू इच्छितो”, असा इशारा राऊतांनी दिला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT