संजय राऊत यांची पत्रकार परिषद, ‘झुकेंगे नहीं’ म्हणत शिवसेना भवनाबाहेर कार्यकर्त्यांनी लावले पोस्टर्स

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवसेना खासदार संजय राऊत हे आज मुंबईत पत्रकार परिषद घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर वातावरण तापू लागलं आहे. मुंबईतल्या शिवसेना कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी झुकेंगे नहीं म्हणत पोस्टर्स लावले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी उप राष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहिलं होतं. या पत्रात त्यांनी ईडी आणि इतर तपासयंत्रणांचा भाजपकडून कसा गैरवापर होतो आहे त्याबद्दल सविस्तर तक्रार केली होती.

ADVERTISEMENT

याच संदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्लीमध्ये पत्रकारांना हे सांगितलं होतं की आता पुढची पत्रकार परिषद मुंबईत असणार आहे. आम्ही आता झुकणार नाही. जो काही गौप्यस्फोट करायचा तो मुंबईत शिवसेना भवन या ठिकाणी करणार आहेत. आता या पत्रकार परिषदेत संजय राऊत काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत शिवसैनिकांनी झुकेंगे नही म्हणत पोस्टर लावले आहेत.

संजय राऊन आणि प्रविण राऊत यांच्यामध्ये आर्थिक व्यवहार, ED च्या चार्जशीटमध्ये नोंद

हे वाचलं का?

शिवसेना खासदार संजय राऊत आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार असून संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. संजय राऊत यांनी या पत्रकार परिषदेत आपण मोठे खुलासे कऱणार असल्याचं जाहीर केलं असून यावेळी ते काय सांगतात याची उत्सुकता आहे. काय उखडायचं ते उखडा, बघू कोणात किती दम आहे, असं म्हणत त्यांनी भाजपाला खुलं आव्हान दिलं असून पुढील काही दिवसात भाजपाचे साडेतीन लोक अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील आणि अनिल देशमुख बाहेर असतील, असा इशारा दिला आहे. दरम्यान या पत्रकार परिषदेआधी त्यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

संजय राऊत यांच्यामागे ED हात धुऊन का लागली आहे? पत्रा चाळ प्रकरण काय आहे?

ADVERTISEMENT

‘मी आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. कधीतरी शिवसेनेची पत्रकार परिषदही ऐका. सौ सोनार की, एक लोहार की…’ असं राऊत यावेळी म्हणाले. किरीट सोमय्यांच्या आरोपांबाबत विचारलं असता त्यांनी बोलणं टाळलं.

ADVERTISEMENT

संजय राऊत यांना यावेळी ईडीकडून सुरु असलेल्या धाडींबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, ‘माझ्याकडे माहिती नाही. जर राष्ट्राच्या सुरक्षेसंदर्भात काही विषय असतील, काही गंभीर गोष्टी असतील आणि केंद्राकडे तशी काही माहिती असेल तर केंद्रीय तपास यंत्रणांना सहकार्य करणं गरजेचं आहे. यासंबंधी आपण जास्त बोलू नये. कारवाई सुरु असेल तर राज्य आणि केंद्र सरकराने एकत्रित काम करायला हवं.’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT