पुणे विद्यापीठाच्या शांतीश्री धुलिपुडी पंडित ‘जेनएनयू विद्यापीठा’च्या नव्या कुलगुरू
दिल्लीत प्रसिद्ध जवाहर लाल नेहरू विद्यापीठाच्या (Jawaharlal Nehru University) कुलगुरूपदी प्रा. शांतीश्री धुलिपुडी पंडित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रा. शांतीश्री धुलिपुडी पंडित (Santishree Dhulipudi Pandit) या सध्या पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) कार्यरत असून, जवाहर लाल नेहरू विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू ठरल्या आहेत. जवाहर लाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी असलेल्या शांतीश्री धुलिपुडी […]
ADVERTISEMENT
दिल्लीत प्रसिद्ध जवाहर लाल नेहरू विद्यापीठाच्या (Jawaharlal Nehru University) कुलगुरूपदी प्रा. शांतीश्री धुलिपुडी पंडित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रा. शांतीश्री धुलिपुडी पंडित (Santishree Dhulipudi Pandit) या सध्या पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) कार्यरत असून, जवाहर लाल नेहरू विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू ठरल्या आहेत.
ADVERTISEMENT
जवाहर लाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी असलेल्या शांतीश्री धुलिपुडी पंडित या मावळते कुलगुरू प्रा. जगदीश कुमार यांच्याकडून पदभार घेतील. शांतीश्री धुलिपुडी पंडित यांची पाच वर्षांसाठी कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जवाहर लाल नेहरू विद्यापीठ केंद्रीय विद्यापीठ असून, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी देशात आणि परदेशात प्रसिद्ध आहे.
कोण आहेत शांतीश्री पंडित?
हे वाचलं का?
जवाहर लाल नेहरू विद्यापीठाच्या नव्या कुलगुरू शांतीश्री धुलिपुडी पंडित यांचा जन्म 15 जुलै 1962 रोजी झालेला आहे. त्यांचा जन्म रशियातील सेंट पीट्सबर्गमध्ये झालेला आहे. त्यांचे वडील सेवानिवृत्त अधिकारी, लेख आणि पत्रकार होते.
शांतीश्री पंडित यांच्या आई तामिळ आणि तेलगु भाषा विषयाच्या प्राध्यापक होत्या. शालेय जीवनातच गुणवत्त सिद्ध केलेल्या पंडित यांनी सामाजिक मानशास्त्रामध्ये बीएची पदवी घेतली. प्रेसिडन्सी महाविद्यालयातून त्यांनी पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी सुवर्ण पदकासह 5 पदक आणि 2 विद्यापीठ पुरस्कारही जिंकले होते.
ADVERTISEMENT
शांतीश्री पंडित यांनी राज्यशास्त्र विषयातून पदव्युत्तर पदवी अर्थात एमएचं शिक्षण पुर्ण केलं. त्यानंतर आंतरराष्ट्रीय संबंध या विषयावर एमफिलची पदवी घेतली. शांतीश्री पंडित 83.4 टक्के गुणांसह जेएनयू विद्यापीठात टॉपर राहिलेल्या आहेत.
ADVERTISEMENT
जेएनयूमध्ये शिक्षण घेत असतानाच्या काळात 1985-87 मध्ये त्या तामिळनाडू विद्यार्थी असोसिएशनच्या सचिवही राहिल्या होत्या. त्यांना 34 वर्षांच्या अध्यापनाचा अनुभव आहे. शांतीश्री पंडित या सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT