Maharashtra Lockdown E-Pass: ई-पास कसा मिळवाल, पाहा संपूर्ण माहिती एका क्लिकवर

मुंबई तक

मुंबई: E-pass Online Maharashtra: कोरोनाची (Corona) दुसरी लाट ही अत्यंत घातक असून त्यात अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत. अशावेळी कोरोनाला रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊनचा (Lockdown) निर्णय घेतला आहे. याचसोबत आज (23 एप्रिल) महाराष्ट्र पोलिसांनी (Maharashtra Police) असंही जाहीर केलं की, आता यापुढे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी आपल्याला ई-पास (E-Pass) आवश्यक असणार […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

मुंबई: E-pass Online Maharashtra: कोरोनाची (Corona) दुसरी लाट ही अत्यंत घातक असून त्यात अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत. अशावेळी कोरोनाला रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊनचा (Lockdown) निर्णय घेतला आहे. याचसोबत आज (23 एप्रिल) महाराष्ट्र पोलिसांनी (Maharashtra Police) असंही जाहीर केलं की, आता यापुढे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी आपल्याला ई-पास (E-Pass) आवश्यक असणार आहे.

राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्यात आल्याने आता अनेक राज्यातील अनेक जण हे आपल्या खासगी वाहनाने आपल्या मूळ गावी जाण्याची दाट शक्यता आहे. पण यामुळे कोरोनाची संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. यामुळेच आता राज्य सरकारने फक्त अत्यावश्यक कामांसाठीच परगावी जाण्याची परवानगी दिली आहे. त्यासाठी आपण खासगी वाहनाने प्रवास करणार असाल तर आपल्याकडे ई-पास असणं गरजेचं आहे.

E-Pass Maharashtra: लॉकडाऊनमधील ‘तो’ नियम पुन्हा आला, प्रवासासाठी ई-पास हवा!

लॉकडाऊनमुळे आता जर आपल्याला अत्यावश्यक कामासाठी कुठे जायचं असेल तर त्यासाठी आधी आपल्याकडे ई-पास आवश्यक आहे. पण आता हा ई-पास नेमका मिळवायचा कसा? हे आता आम्ही आपल्याला सांगणार आहोत. जाणून घ्या महाराष्ट्रात ई-पास नेमका कसा मिळवायचा.

हे वाचलं का?