Tauktae Cyclone: पाहा मुंबईत पोहचलेल्या चक्रीवादळाचा आता पुढचा प्रवास कसा असणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: महाराष्ट्राला (Maharashtra) सध्या कोरोनासोबतच (Corona) ‘तौकताई’ या चक्रीवादळाचा (Tauktae Cyclone) देखील सामना करत आहे. अरबी समुद्रात (Arabian Sea) कमी दाबाच्या पट्टा तयार झाल्याने या वादळाची निर्मिती झाली आहे. (Cyclone) कालपासून (16 मे) हे वादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात घोंघावत आहे. त्यामुळे या वादळाचा बराच फटका गोव्यासह कोकण किनारपट्टी भागाला बसला आहे. सध्या या वादळाने मुंबईत एंट्री केली असून आता ते पालघर-डहाणूमार्गे थेट गुजरातमध्ये जाऊन धडकणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

तौकताई हे वादळ आज (17 मे) सकाळी 7 वाजेच्या सुमारास मुंबईपासून आत 150 किमी खोल समुद्रात पोहचलं आहे. या चक्रीवादळामुळे मुंबईत सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस बरसत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच तुफान वेगाने वारा देखील वाहत आहे. यामुळेच या वादळाची नेमकी दिशा काय आहे हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात

जाणून घेऊयात कोणत्या वेळी वादळ कुठे असणार

हे वाचलं का?

15 मे (दुपारी 3 वाजता, कारवार – कर्नाटक)

15 मे रोजी तौकताई हे चक्रीवादळ कर्नाटकच्या (Karnataka) कारवार अंकोला, भटकळ, कुमटा या किनारपट्टी भागात होतं. विंडी या हवामानदर्शक वेबसाइट नुसार या चक्रीवादळाने हळूहळू ताकद जमा केली आणि नंतर ते पुढे सरकत गेलं.

ADVERTISEMENT

Tauktae Cyclone: चक्रीवादळाने दिशा बदलली, पाकिस्तानवर धडकणारं वादळ आता महाराष्ट्रातून गुजरातच्या दिशेने!

ADVERTISEMENT

15 मे (रात्री 11 वाजता, गोव्याच्या सीमेवर)

तौकताई हे चक्रीवादळाने 15 मे रात्री 11 वाजेच्या सुमारास गोव्याच्या (Goa) किनारपट्टी पोहचलं. त्यावेळी या वादळाने प्रचंड ताकद कमावलेली होती. त्यामुळे गोव्याच्या मडगाव, पणजी येथे सोसाट्याचा वारा आणि जोरदार पावसाच्या सरी बरसत होत्या. तसंच अनेक ठिकाणी बरीच पडझड झाल्याचं पाहायला मिळालं.

16 मे (पहाटे 5 वाजता, पणजी – गोवा)

तौकताई चक्रीवादळ हा सातत्याने आपली दिशा बदलत गेल्याने 16 मे रोजी पहाटे 5 वाजेच्या सुमारास हे वादळ गोव्याची राजधानी पणजीच्या (Panaji) नजीक पोहचलं होतं . त्यामुळे पणजी आणि नजीकच्या परिसरात प्रचंड वेगाने वादळी वारे वाहत होते.

16 मे (सकाळी 10 वाजता, मालवण – महाराष्ट्र)

तौकताई हे चक्रीवादळाने 16 मे सकाळी 8 वाजेच्या सुमारास महाराष्ट्रात (Maharashtra) प्रवेश केला होता. यामुळे सुरुवातीला सावंतवाडी (Sawantwadi) आणि जवळच्या परिसरात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. साधारण सकाळी दहा वाजेच्या सुमारे हे वादळ मालवण (Malvan) किनारपट्टीजवळ पोहचलं होतं. यावेळी या वादळाचा डोळा म्हणजेच केंद्रबिंदू हा मालावण किनारपट्टीच्या अधिक जवळ होता. त्यामुळे येथे अत्यंत वेगाने वारे वाहत होते. याशिवाय समुद्र देखील प्रचंड खवळला होता. त्यामुळे येथील किनारपट्टीच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं होतं.

Cyclone म्हणजे काय? त्यांना नावं नेमकी कशी दिली जातात?

16 मे (संध्याकाळी 5 वाजता, रत्नागिरी – महाराष्ट्र)

सिंधुदुर्ग (Sindhudurga) जिल्ह्यातून तौकताई वादळ हे 16 मे रोजी दुपारच्या सुमारास पुढे सरकलं आणि ते रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास पोहचलं. यावेळी चक्रीवादळाचा गाभा हा काहीसा मागे असल्याने सिंधुदुर्गच्या तुलनेत रत्नागिरी जिल्ह्यात वाऱ्याचा वेग कमी होता. मात्र, येथे देखील समुद्र प्रचंड खवळलेला दिसून आला.

17 मे (पहाटे 2 वाजता, श्रीवर्धन – रायगड)

तौकताई वादळाचा प्रवास हा लांबवरचा असल्याने महाराष्ट्रतील जवळजवळ सर्वच किनारपट्टी भागातून त्याची वाटचाल झाली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातून हे वादळ पुढे सरकून आज (17 मे) पहाटे 2 वाजेच्या सुमारास रायगड (Raigad) जिल्ह्यात पोहचलं. त्यामुळे श्रीवर्धन (Shrivardhan), हरिहरेश्वर (Harihareshwar), दिवे-आगार या किनारपट्टी भागात जोरदार वारे वाहत होते.

दरम्यान, गेल्या वर्षी आलेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा (Nisarga Cyclone) लँडिंग पॉईंट हा रायगड जिल्ह्यातच होता. त्यामुळे येथे प्रचंड नुकसान झालं होतं. या नुकसानात येथील नागरिक अद्याप सावरलेले देखील नाहीत तोच आता तौकताई चक्रीवादळाचा त्यांना फटका बसला आहे.

17 मे (सकाळी 10 वाजता, मुंबई – महाराष्ट्र)

तौकताई वादळ हे आज (17 मे) सकाळी 7 वाजेच्या सुमारास मुंबईपासून 150 किमी आत हे चक्रीवादळ पोहचलं. आता सकाळी 10 वाजेच्या सुमारास हे वादळ मुंबईच्या (Mumbai) अधिक जवळ पोहचणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई आणि इतरच्या परिसरात सकाळपासूनच पावसाच्या सरी बरसत आहेत. मात्र, या वादळाचा मुंबई आणि जवळच्या परिसराला फारसा फटका बसत नसल्याचं सध्या तरी दिसतं आहे. मुंबईची रचना ही खोबणीत आहे. त्यामुळे सहसा वादळ हे मुंबईवर धडकत नसल्याचं आतापर्यंत पाहायला मिळालं आहे. मात्र असं असलं तरीही प्रशासन या वादळाला तोंड देण्यासाठी सज्ज झालं आहे. सोमवारी सकाळी 10 ते दुपारी 1 या दरम्यान तौकताई हे वादळ मुंबईहून पुढे सरकणार आहे.

तौकताई Cyclone : कोकण किनारपट्टीला सावधानतेचा इशारा, मच्छिमारांना सतर्कतेचे आदेश

17 मे (संध्याकाळी 7 वाजता, पालघर – महाराष्ट्र)

17 मे (सोमवार) संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास हे वादळ पालघर जिल्ह्यात पोहचणार आहे. त्यामुळे डहाणू (Dahanu), पालघर (Palghar) येथील किनारपट्टी भागातील गावांना आधीच सतर्कतेचा इशारा देण्यात आाला आहे. येथे समुद्र खवळण्याची शक्यताही अधिक आहे.

18 मे (सकाळी 7 वाजता, दीव – दीव-दमण)

समुद्रात मागील काही दिवसांपासून सुरु झालेल्या या वादळाचा प्रवास साधारण 18 मे (मंगळवार) रोजी संपण्याची शक्यता आहे. कारण याच दिवशी पहाटे सात वाजत हे वादळ दिव-दमण (Diu-Daman) येथे धडकण्याची शक्यता आहे.

तौकताई Cyclone : NDRF चं पथक पुण्याहून गोव्यात दाखल, विविध राज्यांमध्येही पथकं तैनात

18 मे (सकाळी 8 वाजता, केसरिया – गुजरात)

ताकतौई हे वादळ 18 मेच्या सकाळी 7 वाजेच्या सुमारास पूर्ण क्षमतेने गुजरातच्या (Gujurat) उना (Una) तालुक्यातील केसरिया येथे जाऊन धडकणार आहे. यावेळी या वादळाचा केंद्रबिंद येथे असणार आहे. त्यामुळे येथे प्रचंड वेगाने वादळी वारा आणि तुफान पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सॅटलाइट दृश्याच्या माध्यमातून वादळाचा नेमका प्रवास कसा असेल हे आम्ही आपल्याला दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. पण वादळाची दिशा बदलल्यास यामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तौकताई चक्रीवादळाबाबतच्या सर्व बातम्या पाहण्यासाठी ‘मुंबई तक’ नक्की पाहत राहा.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT