दीपिकाचं ‘बेशरम रंग’ गाणं होतंय ट्रोल; डांस स्टेपचीही उडवली जातेय खिल्ली, मीम्स व्हायरल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या ‘पठाण’ चित्रपटातील पहिले गाणे बेशरम रंग ट्रोल होत आहे. दीपिका पदुकोणच्या कामुक डान्स स्टेप्स आणि जैनने मकिबा गाण्याची ट्यून चोरणे यासारखी अनेक कारणे आहेत. सोशल मीडियावर दीपिकाच्या डान्स स्टेप्सवर फनी मीम्स बनवले जात आहेत. बेशरम रंग हे गाणे सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.

ADVERTISEMENT

बेशरम रंग गाण्यावर बनतायेत मीम्स

दीपिका पदुकोणचा बोल्ड आणि ग्लॅमरस अवतार बेशरम रंग गाण्यात दिसला. दीपिकाचा दमदार डान्स चाहत्यांना घायाळ करत आहे. बेशरम रंग कोरिओग्राफीला नोटीस केलं गेलं आहे. अशा परिस्थितीत मीम बनवणारे मागे कसे राहणार? त्यांनी दीपिका पदुकोणच्या हुक स्टेपवर मीम्स बनवले आहेत. दीपिकाची एक डान्स स्टेप आहे ज्यामध्ये ती वाकते आणि वळते आहे. गाणे रिलीज झाल्यावर लोकांची ही हुक स्टेप देखील लक्षात आली. आता यावर बनवलेले मजेदार मीम्स व्हायरल होत आहेत.

ट्रोल होत आहे दीपिकाचा डांस

एका युजरने लिहिले की, बेडखाली त्याची चप्पल शोधत आहे. दुसर्‍याने लिहिले , कोरिओग्राफर, दिग्दर्शक आणि माझी आवडती दीपिका पदुकोण काय विचार करत होती? बॅकग्राउंड डान्सर्स अधिक मजेदार कृती करत आहेत. जशी प्रत्येकांच्या अंगात माता आली आहे. मेकर्सना चांगला कोरिओग्राफर का सापडला नाही, असे युजर्सचे म्हणणे आहे. डान्सिंग स्टेप्स पाहून लोक गोंधळून जात आहेत. एका यूजर्सने विचारले- गाण्यात दीपिका आणि बॅकग्राउंड डान्सर्स काय करत आहेत?

हे वाचलं का?

इतकंच नाही तर दीपिकाच्या डान्सिंग अॅक्टवरच नव्हे तर संपूर्ण गाण्यावरच अनेकजण प्रश्न उपस्थित करत आहेत. युजर्सनी पठाणच्या बेशरम रंग या गाण्याला कॉपी म्हटले आहे. तेही जैन यांच्या माकेबा गाण्यातील. वापरकर्त्यांना दोन्ही गाण्यांचे बीट्स सारखेच आढळले आहेत. लोकांनी मेकर्सवर मकिबा गाणे चोरल्याचा आरोप केला आहे. बेशरम रंग आणि मकिबा या दोन्ही गाण्यांच्या क्लिप पुरावा म्हणून शेअर केल्या जात आहेत.

बेशरम रंग गाणं खरंच चोरलेलं आहे?

जर तुम्ही या दोन गाण्यांचे बीट्स ऐकले तर तुम्हाला काही साम्यही दिसून येईल. एकजण म्हणालं, बेशरम रंग ऐकताच मला जाणवले की मी ही धून याआधी कुठेतरी ऐकली आहे. जैन यांच्या मकिबा गाण्याची ही कॉपी आहे. विशाल-शेखरने उत्तम काम केले आहे. मूळ निर्मात्याचा उल्लेख नाही. दुसऱ्यानं म्हटलंय, पठाणचे गाणे फ्रेंच गायक जैन यांच्या मकिबा गाण्यातून चोरले आहे. पठाणच्या मेकर्सला लोक खूप ट्रोल करत आहेत. माकिबाच्या गाण्याबद्दल बोलायचे झाल्यास, ते फ्रेंच गायक-गीतकार जैन यांनी गायले आहे. हे गाणे 2015 मध्ये रिलीज झाले होते. हे गाणे त्याच्या झनाका या पहिल्या अल्बममधील आहे. हे गाणे सुपर डुपर हिट ठरले होते.

ADVERTISEMENT

किंग खानच्या चाहत्यांना अतुरता

गाण्याच्या कोरिओग्राफीवर आणि मकिबा गाण्यातून चोरले जाणारे बीट्स यावर निर्मात्यांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. बेशरम रंग गाण्याचे नृत्यदिग्दर्शन वैभवी मर्चंटने केले आहे. पठाण पुढील वर्षी २५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाद्वारे किंग खान तब्बल ४ वर्षांनी पडद्यावर पुनरागमन करत आहे. किंग खानचे चाहते चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT