शेगाव संस्थानाचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांचं निधन

मुंबई तक

विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगाव संस्थानाचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांचं आज दुःखद निधन झालं. निस्वार्थ भावनेने सेवेचा ध्यास असणारे, संपूर्ण आयुष्य संस्थांच्या उभारणीसाठी व भक्तांच्या सेवेसाठी वाहून घेणाऱ्या शिवशंकर भाऊंच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येते आहे. गेल्या दोन चार दिवसापासून भाऊंची तब्येत अत्यवस्थ होती. कुठल्याही दवाखान्यात भरती न होता घरीच उपचार करण्याचे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगाव संस्थानाचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांचं आज दुःखद निधन झालं. निस्वार्थ भावनेने सेवेचा ध्यास असणारे, संपूर्ण आयुष्य संस्थांच्या उभारणीसाठी व भक्तांच्या सेवेसाठी वाहून घेणाऱ्या शिवशंकर भाऊंच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येते आहे.

गेल्या दोन चार दिवसापासून भाऊंची तब्येत अत्यवस्थ होती. कुठल्याही दवाखान्यात भरती न होता घरीच उपचार करण्याचे भाऊंच्या सूचनेनुसार डॉक्टरांच्या मार्गदर्शनात उपचार सुरू होता परंतु रक्तदाब कमी झाल्याने आज संध्याकाळी ५ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विदर्भाची पंढरी म्हणून ओळखले जाणारे शेगाव संस्थान त्यांच्या निधनाने पोरकी झाल्याची भावना सर्वत्र बोलून दाखवली जात आहे.

शिवशंकर पाटील यांच्या निधनानंतर राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेत्यांनीही त्यांना आदरांजली वाहिली आहे.

शिवशंकर पाटिल याना भक्तीचा ओढा होता, सेवेसाठी वाहून घेण्याची तयारी होती. तारुण्यातच भाऊ मंदिर संस्थांच्या व्यवस्थापनात सामील झाले. त्यांचे व्यवस्थापन कौशल्य फार महत्त्वपूर्ण ठरले असून शेगाव संस्थान च्या मंदिर व्यवस्थापनाची चर्चा फक्त महाराष्ट्रातच नव्हे; तर देश आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा वाखाणली जाते.

हे वाचलं का?