Raj Kundra : कंडक्टरचा मुलगा, हिरे व्यापारी, शिल्पा शेट्टीशी लग्न ते पॉर्न प्रकरण; जाणून घ्या खास गोष्टी
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. पॉर्न फिल्म आणि अॅप प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी मंगळवारी जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये राज कुंद्राची सगळी मोडस ऑपरेंडीही समजावून सांगितली. अश्लील व्हीडिओच्या प्रकरणात आत्तापर्यंत 11 जणांना अटक करण्यात आली आहे. राज कुंद्राला अटक केल्यानंतर आणखी एकाला पोलिसांनी अटक केली. राज […]
ADVERTISEMENT
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. पॉर्न फिल्म आणि अॅप प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी मंगळवारी जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये राज कुंद्राची सगळी मोडस ऑपरेंडीही समजावून सांगितली. अश्लील व्हीडिओच्या प्रकरणात आत्तापर्यंत 11 जणांना अटक करण्यात आली आहे. राज कुंद्राला अटक केल्यानंतर आणखी एकाला पोलिसांनी अटक केली. राज कुंद्रा हे नाव पहिल्यांदाच कुठल्या गुन्हेगारी प्रकरणात समोर आलं आहे असं नाही. एका कंडक्टरचा मुलगा ते बिझनेसमन, त्यानंतर शिल्पा शेट्टीशी लग्न आणि आता हे पॉर्न प्रकरण या सगळ्या गोष्टींबाबत आपण जाणून घेऊय सविस्तर
ADVERTISEMENT
राज कुंद्राचा जन्म ब्रिटनमध्ये
हे वाचलं का?
राज कुंद्रा यांचे वडील हे लुधियानामधून ब्रिटनमध्ये स्थायिक झाले. त्यानंतर लंडनमध्ये राज कुंद्राचा जन्म झाला. राज कुंद्राच्या वडिलांचं नाव कृष्णन कुंद्रा असं आहे तर त्याच्या आईचं नाव उषा राणी कुंद्रा आहे. राज कुंद्रा यांच्या वडिलांना देश सोडून ब्रिटनमध्ये जावं लागलं तिथे ते बस कंडक्टरची नोकरी करत होते. तर राज कुंद्राची आई एका दुकानात मदतीनस म्हणून काम करत होती. राज कुंद्राने शिक्षण मधेच सोडलं वयाच्या 18 व्या वर्षी तो दुबईला गेला आणि त्यानंतर नेपाळला गेला. तिथे त्याने पश्मानी शालींचा व्यवसाय सुरू केला.
असा होता पहिला व्यवसाय
ADVERTISEMENT
नेपाळला जाऊन आल्यानंतर राज कुंद्राचं आयुष्य बदलं. त्यांनी यावेळी त्यांच्या पश्मिना शालींचा व्यवसाय सुरू केला आहे. तिथूनच एक उद्योगपती म्हणून राज कुंद्रा उदयास येऊ लागला. हळूहळू राजने हिरे व्यापारही सुरू केला. बेल्जियम, रशिया यासारख्या देशांमध्ये हिरे व्यापार सुरू केल्यानंतर राज कुंद्राने RK कलेक्शन लिमिटेड नावाची कंपनी सुरू केली. या कंपनीच्या माध्यमातून ते लंडनमधील फॅशन हाऊसेसला महागडे कपडे विकू लागले. या व्यवसायातून त्याची भरभराट होण्यास सुरूवात झाली.
ADVERTISEMENT
Raj Kundra ला का अटक करण्यात आली? मुंबई पोलिसांनी स्पष्ट केली मोडस ऑपरेंडी
पहिलं लग्न कविताशी मग घटस्फोट त्यानंतर शिल्पा शेट्टीसोबत लग्न
राज कुंद्राचं पहिलं लग्न कविता नावाच्या मुलीशी झालं होतं. मात्र 2009 मध्ये राज कुंद्रा आणि कविता यांचा घटस्फोट झाला. या दोघांना डिलीना नावाची एक मुलगी आहे. 2007 मध्ये राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांची ओळख झाली. कवितासोबत घटस्फोट झाल्यानंतर शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी लग्न केलं. या दोघांनी नोव्हेंबर 2009 मध्ये लग्न केलं. या दोघांना विवान आणि समीक्षा नावाची दोन मुलं आहे.
राज कुंद्राने ऑनलाईन टीव्ही प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक केली होती. बेस्ट डिल टीव्ही असं या प्लॅटफॉर्मचं नाव होतं. मात्र राज कुंद्राचा हा व्यवसायही कायदेशीर अडचणींमध्ये अडकला. 2012 मध्ये राज कुंद्राने सुपर लीग फाईट केली होती. त्यावेळी अभिनेता संजय दत्त हा राज कुंद्राचा पार्टनर होता. मात्र या लीगने बस्तान बसवण्याआधीच गाशा गुंडाळला. राज कुंद्रा हा युकेमधील ट्रेडकॉप लिमिटेड कंपनीचा सीईओही आहे.
बिटकॉईन घोटाळा झाला तेव्हाही राज कुंद्राचं नाव पुढे आलं होतं. याप्रकरणी 2018 मध्ये राज कुंद्राला ईडीने समन्स बजावलं होतं. जून 2018 मध्ये राज कुंद्राची ईडीकडून कसून तपासणीही करण्यात आली होती. 2017 मध्ये राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी या दोघांचं नाव चर्चेत होतं कारण या दोघांनी ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून एका व्यापाऱ्याला लाखोंचा गंडा घातल्याचं प्रकरण तेव्हा समोर आलं होतं. त्यावेळी राज कुंद्रा, शिल्पा शेट्टी आणि त्यांच्या तीन साथीदारांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता.
बेस्ट डील टीव्ही कंपनीच्या माध्यमातून विविध कंपनीचे प्रोडक्ट विक्रीचा ऑनलाइन शॉपिंगचा व्यवसाय उद्योगपती राज कुंद्राने पत्नी शिल्पा शेट्टीच्या नावाने सुरु केला होता. व्यवसायात नफा व्हावा,यासाठी रवी मोहनलाल भालेरीया या व्यापाऱ्याने बेस्ट डील टीव्ही कंपनी मार्फत 5 कोटी रुपयांच्या बेडशीटची ऑर्डर घेतली होती.या व्यवहारात 23 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे, असा आरोप भालेरीया यांनी केला होता. याप्रकरणी शिल्पा शेट्टी, तिचा पती राज कुंद्रा, दर्शित शाह, उदय कोठारी, वेदांत विकास बल्ली यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हेगारी जगताशी संबंधाचे आरोप
अंडरवर्ल्ड डॉन इक्बाल मिर्ची यांच्यासोबत राज कुंद्राचे आर्थिक संबंध असल्याचा आरोपही त्याच्यावर झाला आहे. ईडीने यासंबंधी कुंद्राला नोटीसही दिली होती.पण राज कुंद्राने हे सर्व आरोप फेटाळले होते.
आयपीएल बेटिंग प्रकरणी आजीवन बंदी आणि क्लिनचिट
राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी इंडियन प्रीमिअरलीग स्पर्धेतील राजस्थान रॉयल्स संघाचे सहमालक होते. 2009मध्ये या जोडप्याने राजस्थान रॉयल्स संघात गुंतवणूक केली होती. 2013 आयपीएल हंगामादरम्यान सट्टेबाजीप्रकरणी दिल्ली पोलिसांनी राज यांची चौकशी केली होती. जुलै 2015 मध्ये सर्वोच्च न्यायालयातर्फे गठित झालेल्या तीन सदस्यीस समितीने राज कुंद्रासह बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन.श्रीनिवास यांचे जावई गुरुनाथ मयप्पन यांना आयपीएल सामन्यांवर सट्टा लावल्याप्रकरणी आजीवन बंदी घातली होती. कुंद्रा सहमालक असलेल्या राजस्थान रॉयल्स संघावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. दरम्यान दिल्ली पोलिसांनी पुराव्याअभावी राज कुंद्राला क्लिनचिट दिली.
माझ्यावरील आजीवन बंदी हटवण्यात यावी. न्यायालयीन यंत्रणेवर माझा विश्वास आहे. दिल्ली पोलिसांनी माहिती अधिकाराला उत्तर देताना जे म्हटलं आहे ते आम्ही न्यायालयाला सादर केलं आहे. पोलिसांनी मला क्लिन चिट दिली आहे तर मग माझ्यावर बंदीची कारवाई का? जे कृत्य मी केलेलं नाही त्याची शिक्षा मी का भोगू? असा सवाल राज कुंद्राने केला होता.
बंदीच्या कारवाईने माझी प्रतिमा मलिन झाली आहे.आयपीएलमधील सर्व संघमालकांमध्ये सगळ्यात कमी पैसा माझ्याकडे होता. माझ्याविरुद्ध कोणताही पुरावा नसतानाही कारवाई झाली.हे सगळं अत्यंत वेदनादायी होतं. राजस्थान रॉयल्स संघाशी माझी नाळ किती जुळलेली आहे हे तुम्ही पाहिलं आहे. माझ्या भावना खोट्या नाहीत असंही राज कुंद्राने म्हटलं होतं.
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेटी आणि तिचा पती राज कुंद्रा ही बॉलिवूडमधली सुप्रसिद्ध जोडी आहे.
पॉर्नोग्राफीचं प्रकरण नेमकं काय आहे?
फेब्रुवारी 2021 मध्ये क्राईम ब्रांचने एक केस मालवणी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. ही केस अश्लील फिल्म किंवा ज्याला पॉर्न फिल्म म्हणता येईल अशा संदर्भातली होती. या केसच्या तपासात असं निष्पन्न झालं होतं की फिल्ममध्ये काम करू इच्छिणाऱ्या नवख्या महिला कलाकारांना वेब सीरिज किंवा शॉर्ट फिल्ममध्ये चांगला ब्रेक देतो असं आमिष देऊन त्यांना ऑडिशनसाठी बोलवण्यात येत असे. वेब सीरिजमध्ये बोल्ड सीन करावे लागतील असं सांगण्यात यायचं. मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन आज राज कुंद्राची या प्रकरणात या मोडस ऑपरेंडी होती ते स्पष्ट केलं. मुंबई पोलीस खात्याचे जॉईंट सीपी मिलिंद भारांबे यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली.
या बोल्ड सीनमध्ये काही सेमी न्यूड आणि न्यूड सीनही चित्रित करण्यात यायचे. याला महिला कलाकारांनी आक्षेप घेतला होता आणि हीच तक्रार घेऊन यातल्या काही महिला कलाकारांनी पोलीस ठाणं गाठलं होतं. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास करताना असं लक्षात आलं की छोटे छोटे सीन किंवा शॉर्ट स्टोरीज तयार करून काही वेबसाईट्स आणि काही मोबाईल अॅप्सना विकल्या जात होत्या. यामध्ये नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. उमेश कामत, रोहा खान, गहना वसिष्ठ, तन्वीर हश्मी असे आरोपी अटकेत केले आहेत. हे वेगवेगळ्या अॅप्सला हे लोक हा कंटेंट विकत असत. सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर या प्रकरणी पुढील अकाऊटिंग होत असे. या सगळ्या प्रकरणी राज कुंद्रासह एकूण 11 जणांना अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT