जन्मोत्सव सोहळ्यातील उपस्थितांच्या संख्येवर मर्यादा; गृह विभागाकडून निर्देश जारी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौड आणि जन्मोत्सव सोहळ्यासाठी राज्य सरकारकडून आज नियमावली जाहीर करण्यात आली. राज्याच्या गृह विभागाने यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रस्ताव पाठवला होता. त्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली असून, कोविड नियमांचं पालन करून शिवजयंती साजरी करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने शिवज्योत दौड आणि जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. शिवज्योत दौडीत दोनशे जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता पाचशे जणांना उपस्थित राहता येईल, अशा गृह विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मान्यता दिली.

आरोग्य नियमांचे पालन करून, सर्वांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेत शिवछत्रपतींचा जन्मोत्सव सोहळा साजरा करावा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

हे वाचलं का?

शनिवारी (१९ फेब्रुवारी) छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. त्या अनुषंगाने गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवज्योत आणि जन्मोत्सव सोहळ्यातील उपस्थितीबाबत विशेष बाब म्हणून अनुमती देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता.

ADVERTISEMENT

या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही मान्यता दिली आहे. तसे निर्देशही गृह विभागासह संबंधित यंत्रणांना दिले जात आहेत. शिवजयंती उत्सवासाठी विविध शिव प्रेरणास्थळांवरून शिवज्योती वाहून आणण्यात येतात. त्यासाठी या शिवज्योजी दौडीत दोनशे जणांना सहभागी होता येईल. तसेच शिव जन्मोत्सव सोहळ्यात पाचशे जण उपस्थितीत राहू शकणार आहेत.

ADVERTISEMENT

कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्षांपासून विविध सण उत्सव साधेपणाने साजरे केले जात आहेत. मागील वर्षी निर्बंधासह शिवजयंती साजरी करण्यात आली होती. सुरूवातील सरकारने 10 लोक एकत्र येण्यास परवागनी दिली होती. त्यानंतर 100 जणांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्यास परवानगी देण्यात आली होती.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT