Uddhav Thackeray: ‘एवढी वर्ष आपण भाजपला पोसलं आणि त्यांनीच…’, उद्धव ठाकरे संतापले
मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना कार्यकर्ते आणि राज्यातील जनतेशी लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधला. पण यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर अत्यंत थेटपणे वार केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात पुन्हा एकदा असं म्हटलं की, युतीत आमची 25 वर्ष सडली या मतावर मी आजही ठाम आहे. ‘मी मागे एकदा बोललो होतो.. […]
ADVERTISEMENT
मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना कार्यकर्ते आणि राज्यातील जनतेशी लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधला. पण यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर अत्यंत थेटपणे वार केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात पुन्हा एकदा असं म्हटलं की, युतीत आमची 25 वर्ष सडली या मतावर मी आजही ठाम आहे.
ADVERTISEMENT
‘मी मागे एकदा बोललो होतो.. की, 25 वर्ष आपली युतीत सडली. तीच भूमिका आणि तेच माझं मत आजही कायम आहे. मी त्या मतावर ठाम आहे.’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अनेक दिवसांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला.
‘आपणच त्यांना पोसलं आणि त्यांनी…’
हे वाचलं का?
‘आज मी आपल्यासमोर खूप दिवसांनी आलो आहे. जे विरोधक माझ्या तब्येतीची काळजी घेत आहेत त्या काळजीवाहू विरोधकांना मी भगव्याचं तेज दाखवणार आहे. जसं काळजीवाहू सरकार असतं तसं हे काळजीवाहू विरोधक आहेत. ते स्वत:च स्वत:च्या काळजीने त्यांचा अंत होणार आहे. त्यामुळे त्यांची चिंता करण्याची गरज नाही.’
‘हे काळजीवाहू विरोधक कोणे ऐकेकाळी आपले मित्र होते. हे नाही म्हटलं तरी आपलं दु:ख आहे. त्याचं कारण आपण त्यांना पोसलं. हो पोसलंच.. मी मागे एकदा बोललो होतो.. की, 25 वर्ष आपली युतीत सडली. तीच भूमिका आणि तेच माझं मत आजही कायम आहे. मी त्या मतावर ठाम आहे.’
ADVERTISEMENT
‘आपण यांच्यापासून का दुरावलो की, त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी आपल्याला एक दिशा दाखवली की.. हिंदुत्वासाठी आपल्याला सत्ता पाहिजे होती.’ अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.
ADVERTISEMENT
‘भाजपचं हिंदुत्व पोकळ आहे’
‘आजचं यांचं जे पोकळ हिंदुत्व आहे ते सत्तेसाठी अंगिकारलेलं एक ढोंग आहे. होय तसेच आहे. जसं वाघाचं कातडं पांघरलेलं गाढव म्हणा शेळी म्हणा.. तसं यांनी हिंदुत्वाचं कातडं पांघरलं आहे. हे आता आपल्या लक्षात आलं आहे. 25 वर्ष यांना पोसल्यानंतर लक्षात आलं.’
‘अनेकदा आपल्यावर टीका होते की, आपण हिंदुत्व सोडलं. पण आपण हिंदुत्व सोडलेलं नाही. मी पुन्हा एकदा सांगतो. हिंदुत्व आम्ही सोडू शकत नाही आणि सोडणारही नाही. आम्ही भाजपला सोडलं हिंदुत्व सोडलेलं नाही.’
‘भाजप म्हणजे हिंदुत्व नाही. म्हणजे त्यांनी वाटेल ते करावं. आता सुद्धा आपल्यावर टीका करताना म्हणतात की, तुम्ही आमच्यासोबत युतीत लढलात. हा लोकशाहीचा अपमान आहे. ही लोकशाही नव्हे.’
‘मध्यंतरी त्यांचे अमित शाह पुण्यात येऊन गेले आणि आपल्यावर टीका करुन गेले. हिंमत असेल तर एकट्याने लढा वैगरे.. मी दसऱ्याच्या मेळाव्यात ते देखील आव्हान स्वीकारलं आहे.’
विरोधकांचं काम जनतेला भरकटवणं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच अॅक्शन मोडमध्ये -आदित्य ठाकरे
‘आम्ही एकट्याने लढू, वीरासारखे लढू.. पण राजकारणात जसे भिडता तसे थेट भिडा.. पण आव्हान द्यायचं आणि मग ईडीची पिडा लावायची. इन्कम टॅक्सची पिडा लावायची. हे शौर्य नाहीए.’ असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी ईडी-इन्कम टॅक्सची भीती दाखवणाऱ्या भाजपवर थेट निशाणा साधला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT