Shiv Sena: प्रमोद महाजनांची शिवसेनेबद्दलची ‘ती’ भविष्यवाणी ठरली खरी!
Shiv Sena। Pramod Mahajan। bow and arrow symbol : स्थापनेपासून ठाकरेंच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या शिवसेनेची सूत्र ठाकरे आडनाव नसलेल्या व्यक्तीच्या हाती गेली. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का आहे. यामुळे आता राजायत भाजप-शिवसेना युतीचं खऱ्या अर्थाने सरकार असणार आहे. एक बदल झालाय, तो […]
ADVERTISEMENT
Shiv Sena। Pramod Mahajan। bow and arrow symbol : स्थापनेपासून ठाकरेंच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या शिवसेनेची सूत्र ठाकरे आडनाव नसलेल्या व्यक्तीच्या हाती गेली. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का आहे. यामुळे आता राजायत भाजप-शिवसेना युतीचं खऱ्या अर्थाने सरकार असणार आहे. एक बदल झालाय, तो म्हणजे भाजप मोठा भाऊ झालाय. याचीच भविष्यावाणी भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांनी केली होती. काय म्हणाले होते प्रमोद महाजन?
ADVERTISEMENT
मुंबई Takशी बोलताना इंडिया टुडेचे सल्लागार संपादक राजदीप सरदेसाई यांनी प्रमोद महाजनांनी शिवसेनेबद्दलचा किस्सा सांगितला. राजदीप सरदेसाई म्हणाले, “20 वर्षापूर्वी मुंबईचे शरीफ नाना चुडासमा होते. त्यांच्या घरी पार्टी होती. प्रमोद महाजन तिथे होते. त्यावेळी केंद्रात एनडीएचं सरकार होतं. वाजपेयींच्या नेतृत्वाखाली. प्रमोद महाजन मोठे मंत्री होते.
मी प्रमोद महाजनांना विचारलं की, “तुम्ही दिल्लीत नंबर वन पार्टी आहात. निवडणुका तुम्ही वाजपेयींच्या नावावर लढवता आहात. पण, महाराष्ट्रात तुम्ही ज्युनिअर पार्टनर आहात. तर ते म्हणाले, ‘जोपर्यंत बाळासाहेब आहेत, तोपर्यंत आम्ही महाराष्ट्रात ज्युनिअर पार्टनर आहोत. ज्या दिवशी बाळासाहेब नसतील किंवा राजकारणात नसतील, त्याच्यानंतर तू बघशील की, हिंदुत्वाच्या या युतीमध्ये भाजप नंबर वन पार्टी होणार आणि शिवसेना नंबर टू पार्टी होणार.’ आणि तेच झालंय.”
हे वाचलं का?
shiv sena symbol: पक्ष, चिन्ह गेलं! ठाकरेंचा पुढच्या लढाई निर्णय ठरला!
“गेल्या आठ वर्षात ते झालं आहे. असं नाही की, आज झालं आहे. गेल्या आठ वर्षात भाजपनं आपलं एक वर्चस्व महाराष्ट्रात वाढवलं. आणि कुठे न् कुठे शिवसेना कमजोर झाली आहे. कारण बाळासाहेबांशिवाय शिवसेनेची ती ताकद नाहीये. तेच प्रमोद महाजनांनी तेव्हा सांगितलं आणि तेच आज झालं आहे.”
ADVERTISEMENT
भाजपचा एकनाथ शिंदे यांना फायदा
“एकनाथ शिंदेंना फायदा असा होतोय की, त्यांच्यासोबत भाजप आहे. म्हणजेच काय त्यांच्याकडे केंद्र सरकार आहे. त्याचा जो फायदा होतोय. त्या कारणामुळे भाजपनं शिवसेनेला एकप्रकारे फोडलं आहे आणि त्याचा फायदा घेतला आहे. हे फक्त महाराष्ट्रात नाही, तर इतर राज्यातही असंच झालंय.”
ADVERTISEMENT
Shiv Sena: उद्धव ठाकरेंच्या हातून शिवसेना गेली, धनुष्यबाण एकनाथ शिंदेंनाच!
भाजप आज राज्यात मोठा भाऊ
“आज जी लढाई आहे उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे… त्याचा फायदा कुणाला होतोय, तर भाजपला. ते मला वाटतं प्रमोद महाजनांनी 20 वर्षापूर्वी सांगितलेलं. ते आता खरं झालं आहे. महाराष्ट्रात भाजप मोठा भाऊ झाला आहे.
“एक भाजपचे नेते होते धरमचंद चोरडिया होते. ते विदर्भात प्रचारासाठी आले होते. त्यावेळी ते मला म्हणाले होते की, ‘आम्हाला खूप वेळ लागले. 15-20 वर्ष लागतील. आम्हाला तीन-चार निवडणुका जाऊ द्याव्या लागतील, तेव्हा आम्ही विदर्भातील पार्टी होऊ.’ 1990 ची निवडणूक होती ती.”
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT