Shiv Sena: शिंदेंच्या व्हिपमुळे ठाकरेंच्या आमदारांचं सदस्यत्व धोक्यात?
Shiv Sena Crisis। Uddhav Thackeray। Ulhas Bapat। Election commission : शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले म्हणाले की, “शिवसेनेच्या सर्व 56 आमदारांना व्हिप बजावला जाणार असून, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना देखील व्हिप लागू होईल.” गोगावलेच्या विधानानंतर ठाकरे गटाच्या आमदारांचं सदस्यत्व धोक्यात येणार का? अशी चर्चा सुरू झाली. यावर उद्धव ठाकरे त्यांची भूमिका मांडली. त्याचबरोबर घटनातज्ज्ञ उल्हास […]
ADVERTISEMENT
Shiv Sena Crisis। Uddhav Thackeray। Ulhas Bapat। Election commission : शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले म्हणाले की, “शिवसेनेच्या सर्व 56 आमदारांना व्हिप बजावला जाणार असून, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना देखील व्हिप लागू होईल.” गोगावलेच्या विधानानंतर ठाकरे गटाच्या आमदारांचं सदस्यत्व धोक्यात येणार का? अशी चर्चा सुरू झाली. यावर उद्धव ठाकरे त्यांची भूमिका मांडली. त्याचबरोबर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी कायदेशीर चौकटीत अर्थ सांगितलं.
ADVERTISEMENT
शिवसेनेचा व्हिप ठाकरेंच्या आमदारांना लागू होणार का?
पत्रकार परिषदेत शिंदे गटाचा व्हिप लागू होणार का असं विचारण्यात आलं. त्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “अजिबात नाही. कारण यामध्ये दोन गटांना ज्यावेळी मान्यता दिली गेली. त्यावेळी दोन्ही गट आहेत, हे मान्य केलं गेलेलं आहे. त्याच्यानुसार त्यांना नाव आणि चिन्ह, आम्हाला नाव आणि चिन्ह दिलं गेलं.”
“जो प्रश्न होता की, मूळ नाव आणि चिन्ह, हे कुणाच? ते तसं देता कामा नये. तसं ते देऊ शकत नव्हते खातरजमा केल्याशिवाय. आम्ही त्यांना चॅलेंज दिलेलं होतं, पण त्या गटाला त्यांनी ते नाव आणि चिन्ह दिलेलं आहे. आमचा आणि त्या गटाचा काहीही संबंध नाही.”
ठाकरेंचं पत्र कोश्यारींच्या जिव्हारी! सांगितलं 12 आमदारांच्या फाईलचं सत्य
हे वाचलं का?
उल्हास बापट शिवसेनेच्या व्हिपबद्दल काय म्हणाले?
उल्हास बापट म्हणाले, “महाराष्ट्रातील हा प्रश्न खू गुंतागुंतीचा आहे. याच्या आधी सुद्धा पक्षांमध्ये फूट पडलेली आहे. परंतु इथे विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे. निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाआधी द्यायला नको होता. त्याचं कारण असं की यांनी काहीही निर्णय दिला, तर सुप्रीम कोर्टावर बंधनकारक नाहीये. पण, सुप्रीम कोर्ट जो निर्णय देईल, तो निवडणूक आयोगाला बंधनकारक आहे.”
बापट म्हणाले, “घटनेचं जे 10वं परिशिष्ट आहे, त्यात अगदी स्पष्ट शब्दात म्हटलेलं आहे की, दोन तृतीयांश आमदार बाहेर जावे लागतात आणि त्यांचं विलीनीकरण व्हावं लागतं. 16 बाहेर पडले आणि त्यांचं विलीनीकरणही झालेलं नाही, त्यामुळे घटनेप्रमाणे ते अपात्र व्हायला पाहिजे. त्यात एकनाथ शिंदे असल्यामुळे त्यांना मुख्यमंत्री राहता येणार नाही.”
Shiv Sena: ठाकरे सुप्रीम कोर्टात, EC वर गंभीर आरोप, याचिकेत काय?
ADVERTISEMENT
“सुप्रीम कोर्टात हा वादाचा मुद्दा आहे. त्यावेळी हे प्रकरण येईल. एक लक्षात घेतलं पाहिजे की, दोन तृतीयांश गेले असं गृहीत धरलं, तर घटनेत असं म्हटलं आहे की, त्यांचा वेगळा पक्ष निर्माण होतो. पण जे राहतात. जे त्यांच्या विलीन होत नाही. त्यांचा वेगळा गट निर्माण होतो आणि ती नवीन राजकीय पार्टी म्हणून ते काम करतील”, असं बापट यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
“त्यामुळे बाहेर पडलेल्यांची वेगळी पार्टी… त्यांना शिवसेना नाव दिलंय. आता उद्धव ठाकरेंकडे जे लोक आहेत, त्यांची वेगळी पार्टी होईल. त्यांचं वेगळं नाव येईल आणि यांचा व्हिप त्यांच्यावर आणि यांचा व्हिप त्यांच्यावर लागू होणार नाही”, असं बापट यांनी सांगतिलं.
Shiv Sena: “अमित शाह महाराष्ट्राचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू”, ठाकरेंचा घणाघात
जुन्या केसेस काढून शिवसेना संपवणार, उद्धव ठाकरे काय म्हणाले?
पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “काल परवा अमित शाह येऊन गेले. त्यांनी सांगितलं की शिवसेना आणि भाजप युती… ती ही युती नाही. हे चोरलेलं धनुष्यबाण आहे. मी तर आव्हान दिलेलं आहे की, हे शिवधनुष्य रावणाला नाही पेललं, ते मिंध्यांना काय पेलणार?”
ठाकरे म्हणाले, “त्यांच्या मागे शिवसेना संपवण्याचा कट आहे. आज शिवसेना नाव आणि चिन्ह त्यांना देण्याचा प्रयत्न झालेला आहे. उद्या ज्या केसेसमुळे ते तिकडे गेले आहेत, त्या केसेस काढून यांना संपवलं की, शिवसेना संपली, असा जर का दिल्लीश्वरांचा डाव असेल, तर ते एव्हढं काही सोप्पं नाहीये. शेवटची आशा आम्हाला सर्वोच्च न्यायालयाकडून आहे. निवडणूक आयोगाच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात गेलेलो आहे.”
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT