Shivrajyabhishek Din 2021 : शिवराज्याभिषेक सोहळा थाटात संपन्न
महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा आज थाटामाटात पार पडला. रायगड किल्ल्यावर खासदार संभाजीराजे छत्रपती आणि काही मोजक्या शिवभक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा विधीवत पार पडला. संभाजीराजेंच्या हस्ते यावेळी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवर खास अभिषेक करण्यात आला. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा हा साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. स्थानिक प्रशासनाने ठराविक लोकांच्या […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा आज थाटामाटात पार पडला. रायगड किल्ल्यावर खासदार संभाजीराजे छत्रपती आणि काही मोजक्या शिवभक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा विधीवत पार पडला. संभाजीराजेंच्या हस्ते यावेळी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवर खास अभिषेक करण्यात आला.
ADVERTISEMENT
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा हा साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. स्थानिक प्रशासनाने ठराविक लोकांच्या उपस्थितीत या सोहळ्याला परवानगी दिली होती. आजच्या दिवसाचं खास वैशिष्ट्य म्हणजे सुमारे ३५० वर्षांपेक्षा अधिक काळानंतर शिवराज्याभिषेकात शिवरायांवर खास सुवर्ण होनांनी अभिषेक झाला. विधीवत सोहळा पार पडल्यानंतर संभाजीराजे छत्रपतींनी सुवर्ण होन आतापर्यंत सांभाळणाऱ्या परिवाराचे आभार मानले. कोरोनाच्या काळात ठराविक लोकांनाच या सोहळ्याला उपस्थित राहता आलं यासाठी शिवभक्तांचीही संभाजीराजेंनी माफी मागितली.
यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत दुर्मिळ व अमूल्य अशा ऐतिहासिक शिवकालीन 'होन' च्या साक्षीने साजरा होणार…
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 5, 2021
राज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वसंध्येला गडावर शिरकाई देवीचा गोंधळ झाला. या सर्व कार्यक्रमासाठी संभाजीराजे स्वतः गडावर जातीने हजर होते. राज्याभिषेक सोहळा पार पडल्यानंतर स्थानिकांचे आभार मानताना पुढच्या वर्षीने अशाच पद्धतीने थाटात राज्याभिषेक सोहळा पार पडला जाईल असं आश्वासन दिलं.
हे वाचलं का?
Shivrajyabhishek Din 2021 : रायगडावर आई शिरकाईचा गोंधळ
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT