महाविकास आघाडी म्हणजे पांढऱ्या पायाचं अपशकुनी सरकार-विनायक मेटे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

रोहिदास हातागळे, प्रतिनिधी, बीड

ADVERTISEMENT

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं तेव्हा शरद पवारांनी मुहूर्त पाहिला नव्हता. त्यामुळेच संकटांची मालिका सुरू झाली अशी खोचक टीका शिवसंग्रमाच्या विनायक मेटे यांनी केली आहे. हे पांढऱ्या पायाचं अपशकुनी सरकार आहे अशीही टीका बीड मधल्या पत्रकार परिषदेत विनायक मेटेंनी केली.

हे वाचलं का?

काय म्हणाले विनायक मेटे?

शरद पवार यांनी मुहूर्त बघितला नव्हता.जेव्हा पासून महाविकासआघाडी सरकार सत्तेवर आले तेव्हापासून संकटाची मालिका सुरू झाली हे पांढऱ्या पायाचं अपशकुनी सरकार आहे अशी घणाघाती टीका शिवसंग्राम चे संस्थापक अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी बीड येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाले आहेत या दोन वर्षांमध्ये सरकारची उपलब्धी म्हणजे सर्वांचा विश्वास घात केला. यात व्यापारी, शेतकरी, शेतमजूर, मराठा ,ओबीसी मुस्लिम, आरक्षण यासंदर्भात सर्वच पातळीवर हे सरकार अपयशी ठरले आहे. कोणालाच न्याय देता आला नाही उलट हे सरकार आल्यापासून महाराष्ट्रावर संकटाची मालिका सुरू झाली आहे म्हणून हे सरकार अपयशी अपशकुनी आहे असं विनायक मेटे म्हणाले. तसंच भ्रष्टाचारी महाराष्ट्र करण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले तर धनंजय मुंडे यांनी बीडमधल्या जनतेला भ्रष्टाचारी बनवलं अशी टीका देखील मेटे यांनी केली.

ADVERTISEMENT

‘जाऊ तिथे खाऊ हे या भ्रष्टाचारी सरकारचं धोरण’ देवेंद्र फडणवीसांचे ठाकरे सरकारवर टीकेचे बाण

ADVERTISEMENT

नवाब मलिकांवरही टीका

नवाब मलिक यांना त्यांच्या जावयाच्या व्यतिरिक्त समीर वानखेडे आणि आर्यन खान यांच्यासमोर मुस्लिम समाज दिसत नाही मुस्लिम समाजाचा आरक्षणाच्या संदर्भात कुठलाही निर्णय घेतला जात नाही तसेच त्यांच्या सुविधा संदर्भात देखील कुठला निर्णय घेत नाहीत अशी टीका आमदार विनायक मेटे यांनी मंत्री नवाब मलिक यांच्यावर केली.

शेतकऱ्यांच्या नावावर हे सरकार राजकरण करत..10 हजाराची घोषणा केली पण हेक्टरी5 मिळाले ..विश्वास घात करण हा उद्धव ठाकरे सरकार चा स्थायी भाव आहे. सगळ्याशी विश्वास घात या सरकार ने केला आहे. पीक विम्यात बीड ला वगळले..लबाडी आणि लबाडी पलीकडे या सरकार मधील नेत्यांनी काहीच केलेलं नाही, शेतकरी नागवला उघडयावर पडला. शेतकऱ्यांना आधार देण्या ऐवजी नितीन राऊत यांच्या माध्यमातून वीज कनेक्शन कापणे सुरू.. सर्व सामान्य लोकांचा विश्वास घात करत आहेत.वीज बिल वसुली संदर्भात दादागिरी सुरू आहे.

बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे यांनी पालकमंत्री कसा नसावा हे दोन वर्षात सिद्ध केलं. ते परळी च्या बाहेर पडत नाहीत, ते फक्त एका मतदार संघाचे पालकमंत्री आहेत. त्यांच्या कडून अपेक्षा होत्या त्या फोल ठरल्या अशी टीका आमदार विनायक मेटे यांनी केली.

शिवाजी महाराजांच्या नावाने सरकार चालवता त्याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्मारकासाठी दोन वर्षात दोन मिनिट वेळ काढता आला नाही, यावरून सरकारची शिवाजी महाराज संदर्भात आत्मीयता दिसून येते मुस्लिम आरक्षण, धनगर आरक्षण संदर्भात काहीच केले नाही,ओबीसी संदर्भात गळे काढले पण.काहीच प्रयत्न करत नाहीत.आम्ही ओबीसी च्या बाजूने आहोत. असे देखील आमदार विनायक मेटे म्हणाले

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT