एका बँकेसाठी जळगावात शिवसेना-राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर शिवसेना-राष्ट्रवादी आणि भाजप या पक्षातीन नेत्यांचा कलगीतुरा संपूर्ण राज्याने अनुभवला आहे. सत्तेत एकत्र असूनही बऱ्याचदा शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची टोलेबाजी सुरु असते. परंतू राजकीय पक्षांसाठी कोणत्याही पातळीवर सत्ता ही किती महत्वाची असते याचं एक उदाहरण जळगावात दिसून आलं. एरवी एकमेकांवर टिका करण्यात व्यस्त असलेले भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव […]
ADVERTISEMENT
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर शिवसेना-राष्ट्रवादी आणि भाजप या पक्षातीन नेत्यांचा कलगीतुरा संपूर्ण राज्याने अनुभवला आहे. सत्तेत एकत्र असूनही बऱ्याचदा शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची टोलेबाजी सुरु असते. परंतू राजकीय पक्षांसाठी कोणत्याही पातळीवर सत्ता ही किती महत्वाची असते याचं एक उदाहरण जळगावात दिसून आलं.
ADVERTISEMENT
एरवी एकमेकांवर टिका करण्यात व्यस्त असलेले भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीनिमीत्त एकत्र आले आहेत.
भाजपला रामराम करुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाल्यानंतर एकनाथ खडसेंनी भाजपला मोठं खिंडार पाडलं. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात अजिंठा विश्रामगृहात पालकमंत्री गुलाबराव पाटील, भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन, राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे एकत्र आलेले पहायला मिळाले. या बैठकीला भाजप आमदार सुरेश भोळे, काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी, शिवसेना आमदार किशोर पाटील, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे देशील उपस्थित होते.
हे वाचलं का?
जळगाव जिल्हा बँकेची आगामी निवडणूक बिनविरोध होण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी बैठक घेतली. एखाद-दुसर्या जागेचा अपवाद वगळता बिनविरोध होण्याबाबत एकमत झाल्याची माहिती आमदार गिरीश महाजन यांनी दिली. जळगाव जिल्हा बँकेची आगामी निवडणूक ही शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस हे चारही पक्ष एकत्रीतपणे लढविणारअसल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. बँकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे पद प्रत्येक पक्षाला सव्वा वर्षे मिळेल, अशा दृष्टीने नियोजन करण्यात आल्याची माहिती देखील पालकमंत्र्यांनी दिली.
विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच गुलाबराव पाटील यांनी भाजपला चांगलाच दणका दिला होता. भाजपचे 11 नगरसेवकांनी सेनेत प्रवेश केला आहे. हे 11 नगरसेवक आधी एकनाथ खडसे यांचे समर्थक होते. त्यानंतर हसत खेळत आज तिन्ही नेते समोरासमोर आले. सर्वपक्षीय पॅनल बैठकीत जिल्हा बँकेच्या जागा वाटपाचा तिढा सुटण्यात जमा आहे. पण, निवडणुकीच्या निमित्ताने सर्व पक्षीय नेते एकत्र आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT