धक्कादायक ! पुण्यात महापालिकेच्या शाळेत, शालेय पोषण आहाराऐवजी पशुखाद्य
पुणे तिथे काय उणे ही म्हण आपण आतापर्यंत अनेकदा चांगल्या-वाईट अर्थाने ऐकली असेल. पुण्यात महापालिका प्रशासनाचा एक भोंगळ कारभार समोर आला आहे. पुण्यातील महापालिकेच्या शाळेत मुलांना शालेय पोषण आहाराऐवजी पशुखाद्य देण्याच आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पुण्याच्या हडपसर भागातील शाळा क्रमांक ५८ मधील मुलींच्या शाळेत ही घटना घडली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर प्रशासनाने झालेल्या […]
ADVERTISEMENT
पुणे तिथे काय उणे ही म्हण आपण आतापर्यंत अनेकदा चांगल्या-वाईट अर्थाने ऐकली असेल. पुण्यात महापालिका प्रशासनाचा एक भोंगळ कारभार समोर आला आहे. पुण्यातील महापालिकेच्या शाळेत मुलांना शालेय पोषण आहाराऐवजी पशुखाद्य देण्याच आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पुण्याच्या हडपसर भागातील शाळा क्रमांक ५८ मधील मुलींच्या शाळेत ही घटना घडली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर प्रशासनाने झालेल्या प्रकाराची चौकशी सुरु केली आहे.
ADVERTISEMENT
हडपसर येथील शाळेत आज शालेय पोषण आहाराचा टेम्पो आला. या टेम्पोमधून माल खाली उतरवत असताना यात अन्नधान्याऐवजी पशुखाद्याची पाकीट दिसून आली. या टेम्पोत हरभऱ्याची ३० तर तूरडाळीच्या २९ गोण्या होत्या. माजी महापौर वैशाली बनकर आणि सामाजिक कार्यकर्ते राजेश गायकवाड यांनी ही घटना उघडकीस आणली.
हे वाचलं का?
घटनेची माहिती मिळताच, अन्न आणि औषध विभागाने घटनास्थळी पोहचून हे संपूर्ण पशुखाद्य ताब्यात घेतलं आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या गोण्यांमध्येही ५ किलो खाद्य कमी असल्याचं समोर आलंय. दरम्यान पुण्याचं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या घटनेची पालिकेतर्फे चौकशी करुन याचा अहवाल राज्य शासनाला दिला जाईल अशी माहिती दिली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT