मनोरंजनाला नो ब्रेक; मराठी मालिकांचं शूटींग महाराष्ट्राबाहेर सुरु

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढताना दिसतेय. कोरोनाला रोखण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ब्रेक द चैन अंतर्गत कठोर निर्बंध लावले आहेत. यामध्ये शूटींगला देखीलं बंदी घालण्यात आली आहे. अशा परिस्थितीत मालिकांचं शूटींग महाराष्ट्राबाहेर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

झी मराठी चॅनेलवरील अनेक मराठी मालिकांचं शूटींग आता महाराष्ट्राबाहेर केलं जात आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनाला ब्रेक लागू नये यासाठी हे एक पाऊल उचलण्यात आलंय. यानुसार, ‘पाहिले ना मी तुला’ आणि ‘अग्गंबाई सूनबाई’ या मालिकांचं चित्रीकरण गोव्यात केलं जात आहे. ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ची टीम दमणला गेली आहे.

हे वाचलं का?

नुकतंच ‘माझा होशील ना’ मालिकेचं शूटींग मनालीमध्ये करण्यात आलं होतं. तर आता या मालिकेचं पुढचं शूटींग सिल्व्हासाला करण्यात येत असल्याची माहिती आहे. दुसरीकडे साताऱ्यातील वाड्यात होणाऱ्या ‘देवमाणूस’ मालिकेचं शूटिंग बेळगावमध्ये होत आहे. आणि ‘चला हवा येऊ द्या’ टीमचा संपूर्ण सेट जयपूरमध्ये उभारण्यात आला असल्याची माहिती आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

वेध भविष्याचा कार्यक्रम सुरुच राहणार असून भगरे गुरुजी रोज सकाळी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘होम मिनिस्टर’चं शूटिंग आदेश बांदेकर त्यांच्या घरातूनच करणार आहेत. याशिवाय ‘रात्रीस खेळ चाले’च्या तिसऱ्या सिझनचं शूटिंग झालं असल्याने या मालिकेचे नवे भाग देखील तयार आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT