सोलापूर: अक्कलकोट महामार्गावर दोन ट्रक, कारमध्ये विचित्र अपघात; 6 जण गंभीर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

विजयकुमार बाबर, सोलापूर: अक्कलकोट रोडवरील कुंभारी गावाजवळ एक विचित्र अपघात झाला आहे. कार आणि दोन ट्रकमध्ये हा भीषण अपघात झाला आहे. ज्यामध्ये सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात एर्टिगा कारचा अक्षरश: चुराडा झाला आहे.

ADVERTISEMENT

सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. वळसंग पोलीस ठाणे हद्दीतील कुंभारी येथील टोल नाकाजवळ दोन ट्रक आणि एक कार या एकामागून एक अशा धडकल्या. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचून दोन तासाच्या अथक प्रयत्नाने क्रेनच्या साह्याने कारमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यात यश आले आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

दरम्यान, हा अपघात नेमका कशामुळे झाला हे मात्र, अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र, अपघातातील जखमींची प्रकृती गंभीर असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

हे वाचलं का?

सोलापूर: ड्रायव्हरचं नियंत्रण सुटलं अन्..

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सोलापूर हायवेवर एक भीषण अपघात झाला होता ज्यामध्ये 4 तरुणांचा जागीच मृत्यू झाला होता. सोलापूर-विजयपूर रोडवर झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला होता. विजयपूरहून सोलापूरकडे येत असताना कारचा भीषण अपघात झाला होता. पहाटेच्या सुमारास हा अपघात झाल्याने जखमींपर्यंत मदत पोहचण्यास देखील बराच वेळ गेला.

ADVERTISEMENT

स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटक राज्यातील विजयपूरहून सोलापूरकडे येत असताना कवठे गावाजवळील ब्रिजला जोरदार धडक बसल्याने हा अपघात झाला होता. ज्यामध्ये गाडीतील चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला होता. पाहटेच्या सुमारास भरधाव चालल्या कारवरील चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला होता.

ADVERTISEMENT

बीड: एसटी बसचा चक्काचूर.. बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू

कार क्रमांक KA-32-2484 ने एकूण पाच जणं काही कामानिमित्त विजापूरहून सोलापूरला येत होते. पण कार सोलापूरजवळील कवठे गावाजवळ अली असता ड्रायव्हरचं कारवरील नियंत्रण सुटल्याने कारची नवीन ब्रिजला जोरात धडक बसली. ही धडक एवढी जोरदार होती की, ज्यामध्ये कारचा अक्षरश: चक्काचूर झाला होता. तर चौघे जण हे जागीच ठार झालेले. यामधील एक जण गंभीर जखमी झाला होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT