Pankaja Munde BJP: ‘कुणी म्हणतं मला पंतप्रधान व्हायचं आहे, ते चालतं का?’ पंकजा मुंडेंचा फडणवीसांना टोला?
मुंबई: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मंगळवारी मुंबईतील वरळी येथे आपल्या कार्यालयाजवळ अत्यंत आक्रमक अशा स्वरुपाचं भाषण केलं. यावेळी त्यांनी अनेक गोष्टींवरुन आपल्या नाराजी तर बोलून दाखवलीच पण पक्षातील विरोधकांवर देखील टिकेची तोफ डागली. पण त्यांच्या या सगळ्या भाषणाचा रोख हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच असल्याचं बोललं जात आहे. यावेळी पंकजा मुंडे यांचा रोख […]
ADVERTISEMENT
मुंबई: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मंगळवारी मुंबईतील वरळी येथे आपल्या कार्यालयाजवळ अत्यंत आक्रमक अशा स्वरुपाचं भाषण केलं. यावेळी त्यांनी अनेक गोष्टींवरुन आपल्या नाराजी तर बोलून दाखवलीच पण पक्षातील विरोधकांवर देखील टिकेची तोफ डागली. पण त्यांच्या या सगळ्या भाषणाचा रोख हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच असल्याचं बोललं जात आहे.
ADVERTISEMENT
यावेळी पंकजा मुंडे यांचा रोख हा थेट फडणवीस यांच्याकडेच असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. कारण आपल्या भाषणात त्यांनी असं म्हटलं आहे की, ‘कुणी म्हणतं मला प्रधानमंत्री व्हायचं आहे ते चालतं का? मग मी का म्हणायचं नाही?’ असं म्हणत पंकजा मुंडेंनी यावेळी अप्रत्यक्षरित्या देवेंद्र फडणवीसांवरच निशाणा साधला आहे.
आपल्या भाषणात पंकजा मुंडे असंही म्हणाल्या की, काही जण मला विचारतात की, ‘जनतेच्या मनातील मुख्यमंत्री हा डायलॉग मारल्यामुळेच मला सगळं अवघड गेलं आहे. पण मी आतापर्यंत स्वाभिमानाने राजकारण केलं आहे. मी कुणाच्या समोर झुकले नाही.’ असं यावेळी म्हणाल्या.
हे वाचलं का?
पाहा आपल्या संपूर्ण भाषणात पंकजा मुंडेंनी अप्रत्यक्षरित्या कसा साधला फडणवीसांवर निशाणा:
‘जे मुळात सौंदर्य असतं त्याला कोणत्याही अलंकारची गरज नसते. ज्याला अलंकाराची गरज असते त्याला मुळातलं सौंदर्य नसतं. माझ्याकडे नसतील पक्षाचे अलंकार नसतील, माझ्याकडे पदाचे अलंकार नसतील पण माझं सौंदर्य तुम्ही आहात. ही शक्ती क्षीण करायची नाही तर आपल्याला वाढवायची आहे.’
ADVERTISEMENT
‘कुणी तरी मला हा देखील प्रश्न विचारला की, ताई तुम्ही जनतेच्या मनातील मुख्यमंत्री हा डायलॉग मारल्यामुळे तुम्हाला सगळं अवघड गेलं आहे का.? मी म्हणाले, मी आतापर्यंत स्वाभिमानाने राजकारण केलं आहे. संघर्ष यात्रा काढताना मला भाजपचा मुख्यमंत्री करायचा आहे असं म्हटलं आहे. मला मुख्यमंत्री व्हायचं आहे असं म्हटलं नाही.’
ADVERTISEMENT
‘हे सगळं निवडणूक झाल्यावर, भाजपचं सरकार आल्यावरच या गोष्टी कशा बाहेर येतात? या गोष्टी पेरल्या आहेत ते मला अवमानित करण्यासाठी.’
‘कुणी म्हणतं मला प्रधानमंत्री व्हायचं आहे ते चालतं का? मग मी का म्हणायचं नाही? पण मी म्हणाले नाही. कधी म्हणणारही नाही. माझ्या देशाचे प्रधानमंत्री, जगात देशाचा मान वाढवणाऱ्या पंतप्रधानांनी मला कधी अपमानित केलं नाही. माझ्या राष्ट्रीय नेत्यांनी मला कधी अपमानित केलेलं नाही.’
Pankaja Munde Speech: PM Modi यांनी मला कधीही अपमानित केलेलं नाही: पंकजा मुंडे
‘माझ्या कोणत्याही गोष्टीमध्ये त्यांनी कधीही मला याबाबत प्रश्न विचारले नाही. तुम्हाला साक्ष ठेऊन सांगते की, मला कधीही कुठलाही प्रश्न विचारला नाही. माझ्या पिढीची त्यांना जाणीव आहे. असं मला वाटतं, असा मला विश्वास आहे. नक्कीच मला भविष्यात तुम्हा सर्वांसकट न्याय हवा आहे. मला एकटीला न्याय नकोय.’ असं म्हणत आपण फक्त केंद्रातील सर्वोच्च नेतृत्वालाच मानतो असंच जणू पंकजा मुंडे यांनी सूचित केलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT