राज ठाकरेंसारखीच फडणवीसांनीही केली अजित पवारांची नक्कल!
पंढरपूर: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या खणखणीत भाषणांसाठी ओळखले जातात. लाखोंच्या जनसमुदायासमोर ज्या पद्धतीने ते भाषण करतात ती स्टाईल अनेकांना भुरळ घालते. समोर बसलेल्या लोकांच्या मनाला कसा हात घालायचा हे त्यांना चांगलं ठावूक आहे. त्यामुळे कधी टीका-टिप्पणी करताना ते विरोधकांच्या नकला देखील करतात. गेल्या काही निवडणुकांच्या प्रचार सभांमध्ये आपल्याला हे पाहायला देखील मिळालं आहे […]
ADVERTISEMENT
पंढरपूर: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या खणखणीत भाषणांसाठी ओळखले जातात. लाखोंच्या जनसमुदायासमोर ज्या पद्धतीने ते भाषण करतात ती स्टाईल अनेकांना भुरळ घालते. समोर बसलेल्या लोकांच्या मनाला कसा हात घालायचा हे त्यांना चांगलं ठावूक आहे. त्यामुळे कधी टीका-टिप्पणी करताना ते विरोधकांच्या नकला देखील करतात. गेल्या काही निवडणुकांच्या प्रचार सभांमध्ये आपल्याला हे पाहायला देखील मिळालं आहे की, राज ठाकरेंनी आतापर्यंत अनेक बड्या नेत्यांच्या नकला करुन त्यांच्यावर राजकीय टीका केली आहे. पण आता राज ठाकरे यांची हीच स्टाइल विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उचलली आहे.
ADVERTISEMENT
त्याचं झालं असं की, मंगळवेढा-पंढरपूर मतदार संघाचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर इथे पोट निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने इते भारत भालके यांचा मुलगा भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपने समाधान आवताडेंना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ही जागा राखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सगळी शक्ती पणाला लावली आहे. तर दुसरीकडे भाजपचा उमेदवार निवडून यावा यासाठी स्वत: देवेंद्र फडणवीस हे येथे प्रचारासाठी आले आहेत.
‘महाविकास आघाडी सरकार कधी बदलायचं आहे ते माझ्यावर सोडा, मी पाहून घेतो’
हे वाचलं का?
याचवेळी एका पंढरपूरमधील एका प्रचारसभेत भाषण करत असताना देवेंद्र फडणवीस यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीच नक्कल करुन दाखवली. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. पाहा देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले:
‘विधानसभेचं अधिवेशन सुरु झालं तेव्हा पहिल्याच दिवशी मी सांगितलं की, लोक कोरोनामुळे होरपळले आहेत. लोकांचं फार नुकसान झालं आहे. गेल्या वर्षभरात लोकांना सरकारने एका फुटक्या कवडीची देखील मदत केलेली नाही. त्यामुळे मायबाप सरकार एवढं करा की, आत्ता तुम्ही जी दुप्पट-दुप्पट विजेची बिलं दिली आहेत तेवढ्या विजेच्या बिलांना स्थगिती द्या. मी असं म्हटल्यावर अजितदादा लगेच उभे राहिले. म्हणाले,’
ADVERTISEMENT
‘बरोबर आहे, आमचं सरकार स्थगिती दिल्याशिवाय राहणार नाही.’ (अजितदादांची नक्कल)
ADVERTISEMENT
विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापासून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात सातत्याने खडाजंगी पाहायला मिळत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक जण याविषयी वेगवेगळी चर्चा करत आहेत. कारण साधारण दीड वर्षापूर्वी फडणवीस आणि अजितदादांनी भल्या सकाळी शपथविधीचा कार्यक्रम उरकला होता. तेव्हापासून जेव्हा-जेव्हा हे दोन्ही नेते एकत्र येतात तेव्हा-तेव्हा त्यांच्याविषयी चर्चा ही होतेच. अशावेळी फडणवीसांनी थेट अजित पवारांची नक्कल केल्याने याविषयी एक नवी चर्चा सुरु झाली आहे.
अजित पवारांच्या बारामतीत भीषण परिस्थिती, कोरोना रुग्णांवर हॉस्पिटलच्या व्हरांड्यात उपचार
राज्यात कोरोनाचा उद्रेक पण नेते निवडणुकीच्या प्रचार दंग
एकीकडे राज्यात कोरोनाची परिस्थिती अत्यंत भयानक होत असल्याचं दिसून येत आहे. पण दुसरीकडे पंढपुरात मात्र राजकारणाला प्रचंड वेग आला आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी पंढरपूरमधील पोटनिवडणूक ही प्रतिष्ठेची बनवली आहे. अशावेळी दोन्ही बाजूंचे नेते हे मोठ्या प्रमाणात जाहीर सभा घेत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत पंढरपुरात तरी मात्र काही वेगळंच चित्र पाहायला मिळतं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT