इंद्राणी मुखर्जींची मुलगी विधीची आईसोबत राहण्याला परवानगी मिळण्याची याचिका कोर्टाने फेटाळली

विद्या

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

इंद्राणी मुखर्जीची (Indrani Mukerjea) मुलगी विधी मुखर्जीने (Vidhi Mukerjea) आपल्याला आईसोबत राहण्याची परवानगी मिळावी अशी याचिका सीबीआयच्या विशेष न्यायालयात केली होती. मात्र मंगळवारी कोर्टाने विधीला ही संमती नाकारली आहे. सीबीआयने या अर्जावर आक्षेप घेतला. ज्यानंतर हा अर्ज नाकारात आला आहे. शीना बोरा (Sheena Bora) हत्याकांड प्रकरणात इंद्राणी मुखर्जीला जामीन मिळाला आहे.

ADVERTISEMENT

शीना बोरा हत्या प्रकरणात इंद्राणी मुखर्जीला जामीन

शीना बोरा हत्याकांड प्रकरणात इंद्राणी मुखर्जीला जामीन मिळाला आहे. इंद्राणीला या प्रकरणात २०१५ मध्ये अटक करण्यात आली होती. हा सगळा संदर्भ विधीने अर्जात दिला होता. माझ्या आईला अटक करण्यात आली होती तेव्हा मी अल्पवयीन होते. मात्र आईला अटक झाल्यापासून आईची साथ, प्रेम आणि जिव्हाळा यापासून वंचित राहिलो आहोत असंही विधीने तिच्या अर्जात म्हटलं होतं.

विधीने अर्जात काय म्हटलं होतं?

माझी आई इंद्राणी मुखर्जीला अटक झाली त्यावेळी मी अल्पवयीन होते.मागच्या सात वर्षात ज्या कालावधीत माझी आई तुरुंगात होती त्या काळात माझ्या मानसिक आरोग्यावर आणि भावनिक आरोग्यावर गंभीर परिणाम झाला आहे. आता आई (इंद्राणी मुखर्जी) तुरुंगातून जामिनावर बाहेर आली आहे. त्यामुळे मला तिच्यापासून दूर राहणं कठीण जातं आहे. त्यामुळे मला आईसोबत राहण्याची तिच्याशी संवाद साधण्याची संमती विधीने अर्जात मागितली होती. तसंच आईसोबत राहणं, आईला बरं नसताना तिची काळजी घेणं हा कोणत्याही मुलाचा किंवा मुलीचा मुलभूत अधिकार आहे असंही याचिकेत म्हटलं आहे. मात्र तिचा हा अर्ज फेटाळण्यात आला आहे.

हे वाचलं का?

शीना बोरा हत्याकांड प्रकरणात इंद्राणीला साडेसहा वर्षांपूर्वी झाली होती अटक

शीना बोरा हत्याकांडातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जीला सर्वोच्च न्यायालयाने मे महिन्यात जामीन मंजूर केला आहे. तब्बल साडेसहा वर्षांनी इंद्राणी मुखर्जी जेलमधून बाहेर आली. जस्टीस एल. नागेश्वर राव, जस्टीस बी.आर.गवई आणि जस्टीस ए.एस.बोपन्ना यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत इंद्राणी मुखर्जीला जामीन मंजूर करण्यात आला. या खटल्याची सुनावणी इतक्यात संपणार नसून इंद्राणी साडेसहा वर्ष तुरुंगात असल्यामुळे तिचा जामीन न्यायालयाने मंजूर केला.

काय आहे शीना बोरा हत्या प्रकरण?

एप्रिल २०१२ मध्ये शीना बोराचं अपहरण करुन हत्या झाल्याची तक्रार मुंबई पोलिसांत दाखल करण्यात आली होती. इंद्राणी मुखर्जीच्या ड्रायव्हरला पोलिसांनी पकडून चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा मान्य करत या प्रकरणात इंद्राणीचाही सहभाग असल्याचं पोलिसांना सांगितलं. गाडीत गळा आवळून शीनाची हत्या करण्यात आल्यानंतर तिचा मृतदेह पेट्रोल टाकून रायगडमध्ये जाळण्यात आल्याचं ड्रायव्हरने पोलिसांना सांगितलं.

ADVERTISEMENT

ज्यानंतर २०१५ साली या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. सीबीआयने इंद्राणी मुखर्जीसह तिचा पती पीटरला अटक केली होती. मार्च २०२० मध्ये पीटर मुखर्जीला स्पेशल कोर्टाने जामीन मंजूर केला होता. काही दिवसांपूर्वीच इंद्राणीने जेलमध्ये असताना एका महिला कैदीने शीना बोराला आपण काश्मीरमध्ये पाहिल्याचं सांगत तपासाची मागणी केली होती. परंतू हा दावा सीबीआयने फेटाळला होता.आतापर्यंत इंद्राणी मुखर्जीने २०१६, २०१७, २०१८, २०२० आणि २०२१ मध्ये जामीनासाठी अर्ज केला होता. अखेर तिला काही महिन्यांपूर्वी जामीन मंजूर करण्यात आला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT