Sputnik-V लसीबाबत मोठी बातमी, Serum आणि रशियन कंपनीमध्ये मोठा करार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे: कोरोना लसीकरणाच्या मोहिमेस वेग देण्यासाठी मंगळवारी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. रशियन बनावटीची स्पुटनिक-व्ही (Sputnik-V)या लसीची निर्मिती आता सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) देखील करणार आहे. सप्टेंबर महिन्यापासून Sputnik-V लसीचे उत्पादन हे सीरमद्वारे सुरू केले जाणार आहे.

ADVERTISEMENT

मंगळवारी रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड ((RDIF)आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्यात याविषयी करार झाला आहे. दरम्यान, Sputnik-V या लसीला सप्टेंबरमध्ये डब्ल्यूएचओची देखील मान्यता मिळू शकते.

याच वर्षी सप्टेंबरमध्ये सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथे Sputnik-V लसीची निर्मिती सुरू होईल. सीरम आणि RDIF मध्ये दरवर्षी 300 मिलियन (30 कोटी) लस डोस तयार करण्याबाबत करार झाले आहेत. विशेष म्हणजे तांत्रिक हस्तांतरणासंदर्भात देखील दोन्ही कंपन्यांमध्ये निर्णय झाला आहे. सीरमला आतापर्यंत सेल, वेक्टरचे नमुने प्राप्त झाले आहेत.

हे वाचलं का?

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही भारतातील लसीची सर्वात मोठी उत्पादक कंपनी आहे. सीरम इन्स्टिट्यूट सध्या पुण्यातील कारखान्यात कोव्हॅक्स, कोविशिल्डची निर्मिती करीत आहे. या व्यतिरिक्त, यूकेमध्ये Codagenix लसीची देखील चाचणी सुरू करण्यात आली आहे.

सीरम इन्स्टिट्यूट व्यतिरिक्त आरडीआयएफने भारतातल्या इतर अनेक कंपन्यांशी (Gland Pharma, Hetero Biopharma, Panacea Biotec, Stelis Biopharma, Virchow Biotech and Morepen)सोबत करार केला आहे.

ADVERTISEMENT

पाहा अदर पुनावाला याबाबत काय म्हणाले आहेत:

ADVERTISEMENT

या करारासंदर्भात सीरम संस्थेचे सीईओ अदर पूनावाला यांनी एक निवेदन जारी केलं आहे. यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की, स्पुटनिक लसीच्या निर्मितीसाठी RDIF सोबत झालेल्या करारामुळे ते खूप खूश आहेत. येत्या काही दिवसांत, आम्ही लाखो डोस बनविण्यास तयार आहोत. कोरोना व्हायरसला मात देण्यासाठी जगातील सर्व देश आणि संस्था लसीकरणासाठी एकत्र आल्या पाहिजेत.

Sputnik-V ही भारतात वापरली जाणारी पहिली परदेशी लस आहे. आतापर्यंत त्याचे लाखो डोस भारतात देण्यात आले आहेत. रशियाच्या Sputnik-V या लसीचा वापर हा एकूण 67 देशांमध्ये केला जात आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT