पिंपरी-चिंचवड महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष ACB च्या जाळ्यात, ९ लाखांची मागितली होती लाच

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यातल्या अँटी करप्शन ब्युरोने आज पिंपरी-चिंचवड महापालिकेत मोठी कारवाई केली आहे. ९ लाखांची लाच मागितल्या प्रकरणी रचलेल्या सापळ्यात ACB ने महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे.

ADVERTISEMENT

या कारवाईचे तपशील बाहेर आले नसले तरीही लांडगे यांनी एका प्रकरणात ९ लाखांची लाच मागितली होती. यातला पहिला हप्ता म्हणून २ लाख आपल्या पी.ए.च्या माध्यमातून स्विकारताना ACB ने ही कारवाई केली आहे. ACB ने यावेळी लांडगे यांचे पी.ए. ज्ञानेश्वर पिंगळे, लिपीक अरविंद कांबळे आणि राजेंद्र शिंदे यांनाही ताब्यात घेतलं आहे.

स्थायी समिती अध्यक्षावर ही मोठी कारवाई करण्यात आल्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेत मोठी खळबळ उडाली आहे. ACB चं एक पथक या प्रकरणाचा तपास करण्यासाठी महापालिकेत तळ ठोकून बसलेलं आहे, ज्यामुळे या प्रकरणात आणखी काही मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT