नाशिकमध्ये 12 मे पासून कठोर Lockdown- छगन भुजबळ
नाशिकमध्ये 12 मे रोजी दुपारी 12 वाजल्यापासून 23 मे पर्यंत लॉकडाऊन आपण कठोर करणार आहोत. अनेक कारखाने असतील, इतर कामगार असतील त्यांना तिथेच थांबवून त्यांची काळजी घ्यावी लागेल यात काहीही शंका नाही, असंही नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं. लोकांना कमीत कमी त्रास होईल याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलं. दादा भुसे […]
ADVERTISEMENT
नाशिकमध्ये 12 मे रोजी दुपारी 12 वाजल्यापासून 23 मे पर्यंत लॉकडाऊन आपण कठोर करणार आहोत. अनेक कारखाने असतील, इतर कामगार असतील त्यांना तिथेच थांबवून त्यांची काळजी घ्यावी लागेल यात काहीही शंका नाही, असंही नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं. लोकांना कमीत कमी त्रास होईल याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT
दादा भुसे हे आपले मंत्री, नरहरी झिरवळ यांच्यासोबत आमची सगळ्यांची मिटिंग झाली. अनेक लोकांचं नुकसान लॉकडाऊनमुळे होणार आहे, शेतकरी, दूध व्यावसायिक, छोटे व्यापारी यांचं नुकसान होणार आहे पण नाशिकमध्ये लॉकडाऊन लावण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. कठोर पावलं उचलावीच लागतील. कर्तव्य म्हणून आपल्याला या गोष्टी कराव्याच लागतील.
पुढच्या दोन दिवसात कोल्हापुरात लागणार कठोर लॉकडाऊन-हसन मुश्रीफ
हे वाचलं का?
कोरोनाची लाट थोपवायची असेल तर आणखी काही पावलं उचलावी लागतील. कोरोनाच्या पहिल्या लाटेत 16 ते 17 हजार रूग्ण आढळत. आता ही संख्या 46 हजारांवर गेली आहे. जो काही अंशतः लॉकडाऊन आहे त्यामुळे कोरोना रूग्ण कमी झाले आहेत. मात्र तरी 33 हजारांच्या आसपास रूग्ण अजूनही आहेत. डॉक्टर, औषधं, रूग्णालयं, परिचारिका यांचे प्रश्न निर्माण झाले आहेत. कारण रूग्ण झपाट्याने वाढत आहेत. अनेक अडचणींना आपण सामोरे जात आहोत. ऑक्सिजनचा साठा वाढवला. २९ ऑक्सिजन केंद्रं आपण निर्माण करत आहोत.
मात्र सगळ्या व्यवस्था करूनही कोरोना रूग्णांची संख्या काही कमी होत नाहीये. कोरोना बरा झाल्यानंतर आता नवं संकट समोर येतं आहे ते म्युकरमायकोसिसचं आहे. डोळे, कान याभोवती बुरशी जमा होते. डोळे काढण्याचीही वेळ काही जणांवर आली आहे. त्यामुळे या रोगाचीही भीती बळावते आहे, यावरचे उपचारही खर्चिक आहेत.
ADVERTISEMENT
महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागात कोरोनाचा कहर, पाहा कुठे-कुठे पुन्हा लागू करण्यात आला कठोर लॉकडाऊन
ADVERTISEMENT
अशात आता तिसरी लाट येईल असंही सांगितलं जातं आहे. ही तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्या अनुषंगाने वेगळ्या हॉस्पिटल्सचीही सोय आपण नाशिकमध्ये करण्यास सुरूवात केली आहे असंही छगन भुजबळ यांनी सांगितलं. विविध संघटना पुढे येत आहेत, डॉक्टर्स पुढे येऊन मदत करत आहेत. अनेक जण मास्क वापरत नाहीत, कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळत नाहीत. आदिवासी समाजाचे लोक लस घ्यायला पुढे येत नाहीत लस घेतल्याने नंपुसकत्व येतं अशी त्यांची धारणा निर्माण झाली आहे. आदिवासी बहुल भागात कोरोनाची चाचणी करण्यासाठी लोक पुढे येत नाही. कुणाचा मृत्यू कोरोनाने झाला तर चारशे माणसं त्याला मांडीवर घेऊन रडत बसतात. त्यामुळे लोकांची समजूत घालणं, ग्रामीण भागात लोकांना समजावून सांगणं आवश्यक आहे.
अडचणी खूप आहेत, लस घेण्यासाठी अनेकांची धडपड सुरू आहे. लस तयार करण्याची प्रक्रिया मंदावली आहे, असे सगळे प्रश्न असताना तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. लॉकडाऊनशिवाय पर्याय उरलेला नाही असंही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT