बारामतीत केक कापून विद्यार्थ्यांनी केला सरकारचा निषेध… पण का?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बारामती: स्पर्धा परीक्षा होऊन तब्बल एक वर्ष उलटल्यानंतर देखील त्याचा निकाल जाहीर न केल्याने बारामतीतील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केक कापून सरकारचा निषेध केल्याचं समोर आलं आहे.

ADVERTISEMENT

15 मार्च 2020 साली सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक या पदासाठी पूर्व परीक्षा घेण्यात आली होती. जवळपास 240 पदासाठी राज्य लोकसेवा आयोगाने ही परीक्षा घेतली हाती. 17 जानेवारी 2020 रोजी ही जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर 15 मार्च 2020 रोजी पूर्व परीक्षा घेण्यात आली होती.

ही परीक्षा होऊन आता तब्बल एक वर्ष उलटलं आहे. तरीदेखील परीक्षेचा निकाल काही जाहीर झालेला नाही. अशावेळी ही परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींनी आपला संताप अतिशय वेगळ्या मार्गाने व्यक्त केला आहे. बारामतीतील विद्यार्थ्यांनी चक्क केक कापून सरकारचा निषेध व्यक्त केला. यावेळी विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर परीक्षेचा निकाल जाहीर करावा अशी सरकार आणि आयोगाकडे मागणी केली आहे.

हे वाचलं का?

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच MPSC ची राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० ही राज्यातील वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आल्याचं घोषित करण्यात आलं होतं. राज्यसेवा पूर्व परीक्षा १४ मार्चला होणार होती पण अवघे तीन दिवस राहिलेले असताना ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं घोषित करण्यात आलं होतं.

MPSC परीक्षेबाबत अत्यंत मोठी बातमी, परीक्षेची
तारीख जाहीर!

ADVERTISEMENT

जेव्हा याबाबतचं वृत्त समोर आलं होतं तेव्हा पुण्यात अनेक विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. यावेळी विद्यार्थी थेट रस्त्यावर उतरले होते. त्याचवेळी भाजपचे अनेक नेते देखील या आंदोलनासाठी पुढे सरसावले होते.

ADVERTISEMENT

विद्यार्थ्यांच्या या आंदोलनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह घेऊन जाहीर करावं लागलं की, लवकरच MPSC परीक्षा घेण्यात येईल. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी असंही म्हटलं होतं की, ‘विद्यार्थ्यांनी त्यांचा अभ्यास करावा, कुणी भडकवतं म्हणून भडकू नये. कोरोनाचा राक्षस डोकं वर काढतो आहे, त्याच्याशी आपल्याला लढा द्यायचा आहेच. मात्र विद्यार्थ्यांनी हा प्रश्न संयमाने घ्यावा.’ अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी केली.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक लाइव्हनंतरच दुसऱ्याच दिवशी आयोगाने परीक्षेची तारीख जाहीर केली. अधिकृत पत्रकानुसार संबंधित परीक्षा ही रविवार, 21 मार्च 2021 रोजी आयोजित करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT