MPSC च्या विद्यार्थ्यांनी कुणी भडकवतंय म्हणून भडकू नये-उद्धव ठाकरे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

दिवाळी असताना MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्यावेळीच आश्वासन दिलं होतं की यानंतर जी तारीख जाहीर होईल त्यात बदल होणार नाही असं मी सांगितलं होतं. मात्र MPSC ची परीक्षा पुढे ढकलली आहे ती काही महिन्यांसाठी नाही तर काही दिवसांसाठी आहे. उद्या यासंदर्भातली तारीख जाहीर होईल ती पुढच्या आठ दिवसांमधलीच असेल असं आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या फेसबुक लाईव्हमध्ये जाहीर केलं. विद्यार्थ्यांनी त्यांचा अभ्यास करावा, कुणी भडकवतं म्हणून भडकू नये. कोरोनाचा राक्षस डोकं वर काढतो आहे, त्याच्याशी आपल्याला लढा द्यायचा आहेच. मात्र विद्यार्थ्यांनी हा प्रश्न संयमाने घ्यावा अशी विनंती आज उद्धव ठाकरे यांनी केली.

ADVERTISEMENT

MPSC ची परीक्षा पुढे का ढकलतो आहोत? तर त्यामागचं कारण हे कोरोनाच आहे. जे विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत त्यांची मला काळजी आहे. आपण काही महिन्यांसाठी नाही तर आठ दिवसांसाठी ही परीक्षा पुढे ढकलतो आहोत. कुणीही भडकवतंय म्हणून भडकून जाऊ नये. शुक्रवारी MPSC च्या परीक्षेची तारीख जाहीर होईल आणि ती येणाऱ्या आठ दिवसांमधली असेल असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. परीक्षा जी पुढे ढकलावी लागते आहे ती फक्त विद्यार्थ्यांच्या काळजीनेच आहे. विद्यार्थ्यांनी सहकार्य करावं आणि शांत रहावं परीक्षा घेतली जाणारच विद्यार्थ्यांची जी गैससोय झाली आहे त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

वाढत्या कोरोना रूग्णसंख्येबद्दलही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली. कोरोना रूग्ण वाढू लागले आहेत काही ठिकाणी लॉकडाऊनही लावण्यात आला आहे. प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. अनेक ठिकाणी लोक टेस्ट पॉझटिव्ह येईल या भीतीने टेस्टच करत नाहीयेत ही बाबही चांगली नाही. लोकांनी जास्तीत जास्त प्रमाणात टेस्ट करून घ्याव्या असंही आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT