सचिन वाझे तपासात सहकार्य करत नाहीत ! NIA ची कोर्टात माहिती

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणात मुंबई पोलीस दलाचे अधिकारी सचिन वाझे NIA च्या अटकेत आहेत. वाझे यांची कस्टडी मिळाल्यानंतर NIA ने गेल्या काही दिवसांमध्ये अनेक महत्वाचे पुरावे शोधले आहेत. दरम्यान स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपास ATS चे अधिकारी करत आहेत. सचिन वाझे यांच्या अटकपूर्व जामिनावर आज ठाणे सत्र न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान NIA च्या अधिकाऱ्यांनी सचिन वाझे तपासात सहकार्य करत नसल्याचं सांगितलं आहे.

ADVERTISEMENT

वाझे तपासात सहकार्य करत नसल्यामुळे त्यांची अजुन योग्य पद्धतीने चौकशी करु शकत नसल्याचं NIA ने कोर्टात सांगितलं. वाझे यांच्या चौकशीदरम्यान कोर्टाने त्यांच्या वकीलांना हजर राहण्याची परवानगी दिली आहे. परंतू वाझे यांचे वकील हजर नसल्यामुळे ते तपासात सहकार्य करत नसल्याचं NIA ने सांगितलं. ज्याला उत्तर देताना वाझे यांच्या वकीलांनी त्यांची बाजू मांडणाऱ्या वकीलांच्या पथकातील एक सदस्य साजल यादव हे खास या केससाठी NIA ऑफिसजवळील हॉटेलमध्ये राहत आहेत. चौकशीदरम्यान त्यांना कधीही बोलवता येऊ शकतं, परंतू NIA ने त्यांना चौकशीदरम्यान बोलावलंच नसल्याचं सांगितलं.

दरम्यान वाझे यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामिनीवार आज ATS ने देखील ठाणे सत्र न्यायालयात आपलं म्हणणं मांडलं. सचिन वाझे यांची NIA कस्टडी २५ मार्चला संपते आहे. दरम्यान ठाणे सत्र न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी ३० मार्चपर्यंत पुढे ढकलली आहे.

हे वाचलं का?

मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया या निवासस्थानाच्या बाहेर एक स्कॉर्पिओ २६ फेब्रुवारीला आढळली होती. या स्कॉर्पिओमध्ये स्फोटकं होती. ही स्कॉर्पिओ मनसुख हिरेन यांच्या मालकीची होती. मनसुख हिरेन यांची आणि सचिन वाझे यांची ओळख होती. मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीत आढळला. त्यानंतर या प्रकरणात सचिन वाझेंवर गंभीर आरोप झाले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर सचिन वाझे यांनी कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज केला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT