Swara Bhaskar-Fahad Ahmad: आंदोलनात भेट! स्वराने राजकारण्यासोबत केलं लग्न
swara bhaskar wedding Photos : स्वतंत्र भूमिका मांडणारी आणि नेहमी चर्चेत असणारी अभिनेत्री स्वरा भास्कर अखेर लग्नाच्या बेडीत अडकलीये. स्वरा भास्करने (Swara Bhaskar) समाजवादी नेत्यासोबत (samajwadi party leader) लग्न केलं. स्वरा भास्करने समाजवादी नेते फहाद अहमदसोबत (Fahad Ahmad) लग्न केल्याची माहिती तिच्या सोशल हॅण्डलवरून दिली. स्वराने फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Swara […]
ADVERTISEMENT
swara bhaskar wedding Photos : स्वतंत्र भूमिका मांडणारी आणि नेहमी चर्चेत असणारी अभिनेत्री स्वरा भास्कर अखेर लग्नाच्या बेडीत अडकलीये. स्वरा भास्करने (Swara Bhaskar) समाजवादी नेत्यासोबत (samajwadi party leader) लग्न केलं. स्वरा भास्करने समाजवादी नेते फहाद अहमदसोबत (Fahad Ahmad) लग्न केल्याची माहिती तिच्या सोशल हॅण्डलवरून दिली. स्वराने फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Swara bhaskar tie knot with fahad ahmad)
ADVERTISEMENT
स्वरा भास्करने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिच्या हातावर मेहंदी काढलेली दिसत आहे. यासोबतच स्वराने ट्विटरवर एक व्हिडिओही शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांची प्रेमकहाणी कशी सुरू झाली हे सांगितले आहे.
स्वराने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये स्वरा आणि फहादची लव्हस्टोरी प्रोटेस्टने सुरू झाल्याचे दिसत आहे. याचा संदर्भ देत स्वराने व्हिडिओमध्ये असेही सांगितले आहे की, दोघांनी पहिला सेल्फीही प्रोटेस्टदरम्यान घेतला होता. यानंतर फहादने स्वराला बहिणीच्या लग्नाला बोलावले. त्याचा स्क्रीनशॉट स्वराने शेअर केला आहे.
हे वाचलं का?
बॉलिवूडची आजची स्थिती राहुल गांधींसारखी झालीये; स्वरा भास्कर काय म्हणाली?
यात उत्तर देताना स्वरा म्हणते की, ‘मला शक्य नाही. शूटिंग सोडून येता येणार नाही. यासाठी सॉरी मित्रा. पण तुझ्या लग्नाला मी नक्की येईन.’ स्वरा भास्कर आणि फहाद कोर्ट मॅरेज करताना व्हिडीओमध्ये दिसत आहे.
Sometimes you search far & wide for something that was right next to you all along. We were looking for love, but we found friendship first. And then we found each other!
Welcome to my heart @FahadZirarAhmad It’s chaotic but it’s yours! ♥️✨? pic.twitter.com/GHh26GODbm— Swara Bhasker (@ReallySwara) February 16, 2023
ADVERTISEMENT
‘2019 मध्ये झालेल्या प्रोटेस्ट दरम्यान दोघांची एकमेकांशी ओळख झाली. मग मैत्री आणि नंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांच्या भेटीगाठी वाढू लागल्या आणि प्रकरण लग्नापर्यंत पोहोचले’, असं ती व्हिडीओमध्ये म्हणत आहे.
ADVERTISEMENT
व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये स्वरा भास्करने लिहिले आहे की, “कधीकधी तुम्ही दूर पाहतात आणि मोठ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करता, ज्या तुमच्याजवळच असतात. तुमच्या लक्षात येत नाही की, या मोठ्या गोष्टी तुमच्याजवळच आहेत. आम्ही प्रेम शोधत होतो, पण आम्हाला आधी मैत्री भेटली. आणि मग आम्ही दोघे एकमेकांना भेटलो. फहाद झिरार अहमद, तू माझ्या हृदयात आहेस. माझ्या हृदयात जो गोंधळ सुरू आहे, तो फक्त तुझाच आहे.”
‘देशात मूर्ख लोकांची कमी नाहीये’…व्हायरल व्हीडिओवर स्वरा भास्कर संतापली
फहादने व्हिडिओ केला रिपोस्ट
फहादने स्वराचा व्हिडिओ ट्विटरवर रिपोस्ट केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “मला माहित नव्हते की तुमच्या हृदयातील ही घालमेल इतकी सुंदर असू शकते. माझा हात हाती घेतल्याबद्दल धन्यवाद. लव्ह, स्वरा भास्कर.”
स्वरा आणि फहादचे 6 जानेवारी 2023 रोजी स्पेशल मॅरेज अॅक्ट नुसार लग्न झाले. अभिनेत्री स्वराने 8 जानेवारी रोजी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला होता, ज्यामध्ये तिचे डोके एका अनोळखी माणसाच्या हातावर ठेवलेले दिसत होते.
दोघेही बेडवर पडलेले होते आणि दोघांचेही चेहरे दिसत नव्हते. त्यानंतरही स्वरा रिलेशनशिपमध्ये असल्याचा अंदाज चाहत्यांनी लावला होता. फोटोच्या कॅप्शनमध्ये स्वराने लिहिले होते की, हे प्रेम असू शकते’ आणि चाहत्यांना हिंट दिली होती.
स्वरा भास्कर अनेक वर्षांपासून लेखक हिमांशू शर्माला डेट करत होती. परंतु 2019 मध्ये दोघे वेगळे झाले. हिमांशू त्याच्या वैवाहिक जीवनात आनंदी आहे आणि स्वराने फहादसोबत लग्न केले आहे.
कोण आहे फहाद अहमद?
ज्याच्याशी स्वरा भास्करचे लग्न झाले आहे तो समाजवादी पक्षाची नेता आहे. फहाद अहमद महाराष्ट्र समाजवादी पक्षाच्या युवा समितीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. फहाद हा यूपीच्या बरेली येथील बहेदी भागातील रहिवासी आहे. त्यांनी अलिगड मुस्लिम विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. सध्या टाटा इन्स्टिट्यूट मुंबई येथे पीएचडी करत आहे. CAA-NRCC आंदोलनादरम्यान त्यांची स्वरा भास्करशी भेट झाली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT