ठाण्यातल्या सभेत तलवार दाखवणं भोवलं, राज ठाकरेंवर गुन्हा दाखल
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी ठाण्यात उत्तर सभा घेतली. या सभेच्या आधी त्यांना तलवार भेट देण्यात आली. ही तलवार म्यानातून काढून त्यांनी दाखवली. याच प्रकरणी राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १२ एप्रिलला ठाणे शहरातील राम गणेश गडकरी चौकात पार पडलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जाहीर सभेदरम्यान भेट म्हणून दिलेली तलवार म्यानातून बाहेर काढत […]
ADVERTISEMENT
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी ठाण्यात उत्तर सभा घेतली. या सभेच्या आधी त्यांना तलवार भेट देण्यात आली. ही तलवार म्यानातून काढून त्यांनी दाखवली. याच प्रकरणी राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
१२ एप्रिलला ठाणे शहरातील राम गणेश गडकरी चौकात पार पडलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जाहीर सभेदरम्यान भेट म्हणून दिलेली तलवार म्यानातून बाहेर काढत राज ठाकरे यांनी जमा असलेल्या तमाम आणि सैनिकांना तलवार दाखवली होती. यासंदर्भात राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल होईल अशी शंका राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात होती ती अखेर खरी ठरली. नौपाडा पोलिसांनी भादवि कायदा कलम 34 भारतीय हत्यार कायदा 1959 चे कलम 4 व 25 प्रमाणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मनसेचे ठाणे आणि पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव आणि ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह इतर सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे वाचलं का?
ED नोटीशीनंतर भूमिकेत बदल? राज ठाकरे म्हणतात मी नोटीशींना भीक घालत नाही !
काही दिवसांपूर्वीच मुंबई पोलिसांनी सार्वजनिक कार्यक्रमात तलावर उंचावल्याप्रकरणी मोहीत कंबोज, वर्षा गायकवाड आणि मुंबईचे पालक मंत्री अस्लम शेख यांच्या विरोधातही गुन्हा दाखल केला होता. आता राज ठाकरे यांच्यावरही तलावर भरसभेत दाखवण्यात आल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरेंवर आणखी एक गुन्हा दाखल झाल्याने आता मनसे आणखी आक्रमक पवित्रा घेण्याची चिन्हं आहे.
ADVERTISEMENT
राज ठाकरे पुन्हा म्हणाले… ‘मशिदीच्या बाहेर आम्ही हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणार!’
ADVERTISEMENT
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतल्या शिवाजी पार्कवर गुढी पाडव्याच्या दिवशी भाषण केलं होतं. त्या भाषणानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली. ही टीका करण्यात आल्यानंतर राज ठाकरेंनी टीकेला उत्तर म्हणून ठाण्यात उत्तर सभा घेतली. या उत्तर सभेतल्या भाषणाच्या आधी त्यांना तलवार भेट देण्यात आली. ही तलवार उपसून दाखवणं त्यांना चांगलंच महागात पडलं आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT