Tauktae Cyclone: चक्रीवादळाचा कोकण रेल्वेला फटका, ट्रॅकवर झाडं कोसळल्याने वाहतूक ठप्प

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

रत्नागिरी: तौकताई चक्रीवादळ (Tauktae Cyclone) हे सध्या कोकण किनारपट्टीच्या दिशेने हळूहळू पुढे सरकू लागलं आहे. या वादळच्या येण्याने प्रचंड वेगाने वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी घराची पडझड किंवा झाडं कोसळण्याच्या घटना समोर येत आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यात अनेक ठिकाणी झाडं कोसळल्याचं समोर आलं आहे. यावेळी कोकण रेल्वेच्या (Konkan Railway) रेल्वे ट्रॅकवर जवळजवळ 3 ठिकाणी मोठमोठे वृक्ष उन्मळून पडल्याने नेत्रावती एक्सप्रेस माजोर्डाजवळ रखडली आहे.

ADVERTISEMENT

यामुळे गोव्याच्या दिशेने जाणारी अप आणि डाऊन मार्गावरील थिवि ते मडगाव रेल्वे वाहतूक सेवा खोळंबली असल्याचं समजतं आहे. सध्या तीनही ठिकाणी ट्रॅकवर पडलेली झाडं हटविण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक अद्यापपर्यंत सुरुळीत होऊ शकलेली नाही.

आज (रविवार) सकाळी मडगाववरुन निघालेली नेत्रावती एक्सप्रेस ही ट्रॅकवर झाड कोसळल्याने मडगाव आणि थिवी यांच्यामध्ये रखडली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक मात्र पूर्णपणे ठप्प झाली आहे.

हे वाचलं का?

Tauktae Cyclone: तौकताई चक्रीवादळाचा प्रकोप, अंगावर काटा आणणारी ‘दृश्य’ कॅमेऱ्यात कैद

दरम्यान, या अपघाताबाबतची माहिती मिळताच कोकण रेल्वे मार्गावर तात्काळ टीम पाठवून पडलेली झाडं हटविण्याचं काम हाती घेण्यात आलं. सध्या ट्रॅकवरील झाडं हटविण्याचा काम युद्ध पातळीवर सुरु असून लवकरात लवकर मार्ग मोकळा करुन देण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न आहे.

ADVERTISEMENT

गोव्याला वादळाचा मोठा फटका

ADVERTISEMENT

तौकताई वादळाचा फटका अखेरीस गोवा आणि महाराष्ट्राला बसला आहे. रविवारी सकाळी हे वादळ गोव्यात धडकलं ज्यानंतर महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीवर या वादळाने धडक दिली. सकाळपासून गोव्यात ढगाळ वातावरण तयार झालं होतं. खबरदारीचा उपाय म्हणून गोव्याचा समुद्रकिनारा आणि महत्वाच्या ठिकाणी स्थानिक प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून लोकांना जमण्यास बंदी घातली आहे.

गोव्यातल्या अनेक रस्त्यांवर झाडं कोसळून रस्त्यावरील वाहतूक देखील बंद झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला लावलेले खांब कोसळून अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गोव्यात ताशी ७० ते ८० प्रति किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. ज्याचा फटका गोव्याला बसलाय. गोव्यातील महत्वाच्या शहरांत पोलिसांनी बंदोबस्त केला आहे.

Tauktae Cyclone Live: पुढील काही तास महत्त्वाचे, तौकताई चक्रीवादळाचं होणार ‘अत्यंत भीषण चक्रीवादळात’ रुपांतर

मुंबईत कधीपर्यंत पोहचणार तौकताई चक्रीवादळ?

तौकताई वादळ हे 17 मे रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास मुंबईच्या (Mumbai) आसपास पोहचणार आहे. त्यामुळे मुंबई आणि इतरच्या परिसरात पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. मात्र, या वादळाचा मुंबई आणि जवळच्या परिसराला फारसा फटका बसत नसल्याचं सध्या तरी दिसतं आहे. मुंबईची रचना ही खोबणीत आहे. त्यामुळे सहसा वादळ हे मुंबईवर धडकत नसल्याचं आतापर्यंत पाहायला मिळालं आहे. मात्र असं असलं तरीही प्रशासन या वादळाला तोंड देण्यासाठी सज्ज झाली आहे. सोमवारी सकाळी 10 ते दुपारी 1 या दरम्यान तौकताई हे वादळ मुंबईहून पुढे सरकणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT