Tauktae Cyclone चा साताऱ्यालाही फटका, झाडं कोसळली, घरांचं नुकसान

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानंतर महाराष्ट्रात येऊन धडकलेल्या तौकताई वादळाचा फटका साताऱ्यातही बसला. सोसाट्याचा वारा आणि पाऊस यामुळे साताऱ्यात अनेक मोठमोठी झाडं रस्त्यावर पडली, अनेक घरांवरचे पत्रे-छत उडून गेलं. काही ठिकाणी मोठी झाडं महावितरणच्या विजेच्या खांबांवर पडली ज्यामुळे महाबळेश्वर, पाचगणी भागात रात्रीपासून वीज गायब आहे.

ADVERTISEMENT

रविवारी दुपारपासून सातारा जिल्ह्यात ढगाळ वातावरण व्हायला सुरुवात झाली. हवामान विभागाने कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना वादळाचा फटका बसेल असा अंदाज वर्तवला होता. याव्यतिरीक्त पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रातील काही भाग आणि घाटमाथ्यावरील काही ठिकाणीही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. ज्याचा प्रत्यय साताऱ्यात पहायला मिळाला.

हे वाचलं का?

सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पाचगणी आणि सातारा भागात अनेक झाडं छोटी बैठी घरं आणि दुकानांवर कोसळली ज्यामुळे अनेक घरांचं नुकसान झालंय. काही ठिकाणी विजेच्या ट्रान्सफॉर्मवरही झाडं कोसळल्यामुळे आजुबाजूच्या परिसरातील लोकांना जीव मुठीत घेऊन वावरावं लागत आहे. या चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील फळशेतीलाही फटका बसला असून अनेक शेतकऱ्यांचं यात नुकसान झालंय. साताऱ्यात आणखी एक दिवस मुसळधार पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT