तेलंगणाचे ‘KCR’ महाराष्ट्राच्या राजकारणात! ५ फेब्रुवारीला फुटणार नारळ
नांदेड : तेलंगणातील (Telangana) सत्ताधारी पक्ष ‘बीआरएस’ अर्थात भारत राष्ट्र समितीची (Bharat Rashtra Samithi) महाराष्ट्राच्या राजकारणात एन्ट्री होत आहे. यासाठी नांदेड (Nanded) जिल्ह्याला प्रवेशद्वार म्हणून निवडण्यात आलं आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बीआरएसचे प्रमुख के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांची ५ फेब्रुवारीला नांदेडमध्ये सभा होणार आहे. केसीआर यांची तेलंगणा बाहेर ही पहिलीच सभा आहे. त्या […]
ADVERTISEMENT
नांदेड : तेलंगणातील (Telangana) सत्ताधारी पक्ष ‘बीआरएस’ अर्थात भारत राष्ट्र समितीची (Bharat Rashtra Samithi) महाराष्ट्राच्या राजकारणात एन्ट्री होत आहे. यासाठी नांदेड (Nanded) जिल्ह्याला प्रवेशद्वार म्हणून निवडण्यात आलं आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बीआरएसचे प्रमुख के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांची ५ फेब्रुवारीला नांदेडमध्ये सभा होणार आहे. केसीआर यांची तेलंगणा बाहेर ही पहिलीच सभा आहे. त्या अनुषंगाने नांदेडमध्ये जागेची पाहणी करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान, या सभेच्या तयारीसाठी तेलंगणाचे ४ आमदार नांदेडमध्ये तळ ठोकून आहेत. याशिवाय त्यांनी विविध नेत्यांच्या गाठीभेटी घेणे सुरू केले आहे. माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे यांची भेट घेऊन त्यांना बीआरएसमध्ये येण्याचे निमंत्रण दिले आहे. नांदेडच्या सभेत अनेक नेते, माजी आमदार, खासदार बीआरएसमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा पक्षाच्या या आमदारांनी केला. या सभेच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे.
Uddhav Thackeray: शिंदेंच्या ठाण्यात ठाकरेंची गर्जना, म्हणाले, लवकरच…
हे वाचलं का?
नांदेडचं राजकारण बीआरएस ढवळून काढणार?
काही दिवसांपासून तेलंगणातील बीएसआरचे चार आमदार नांदेडमध्ये तळ ठोकून आहेत. यात आमदार जीवन रेड्डी, बलका सूमन, जोगु रमन्ना, हनुमंत शिंदे यांचा समावेश आहे. नांदेडमधील सभास्थळांची पाहणी त्यांच्याकडून सुरु आहे. बीआरएस नांदेडमधील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच येत्या विधानसभा निवडणुका लढणार असल्याचं या आमदारांनी सांगितलं.
दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील काही सीमावर्ती गावांनी तेलंगणात येण्याची इच्छा व्यक्त केली होती. आपल्याला महाराष्ट्रात सुविधा मिळत नाहीत, असा दावा काही गावांनी केला होता. याबाबत विचारला असता जुक्कल विधानसभा मतदारसंघाचे आमदार हनुमंत शिंदे म्हणाले, महाराष्ट्रातून तेलंगणात यायची त्यांना यायची गरज नाही. तेलंगणातील सुविधा देण्यासाठी आम्हीच महाराष्ट्रात येणार आहोत.
ADVERTISEMENT
Prakash Ambedkar : राष्ट्रवादी दुखावली, ‘मविआ’त ठिणगी! ठाकरेंसमोर संकट
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात मुक्कामी असलेले आमदार आणि पक्षाचे लोक विना नंबरच्या आलिशान गाडीतून फिरत आहेत. शहरात त्यांच्या या विनानंबरच्या गाड्या आणि त्यांचे बॉडीगार्ड पाहून लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. भारतात राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या शिवाय कुणालाही विना नंबरच्या गाड्या वापरता येत नाही. पण तेलंगणातील या आमदारांचा नांदेडमधला हा प्रवास कसा कुणाच्याच लक्षात येत नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT